प्रेमानंद महाराज खूप आजारी असल्याच्या अफवा; अखेर स्वतः महाराजांनीच सांगितलं खरं!

WhatsApp Group

Premanand Maharaj Health News : वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या तब्येतीबद्दल गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. अनेकांनी फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर “महाराज आजारी आहेत”, “गंभीर अवस्थेत आहेत” अशा पोस्ट्स केल्या. या सर्व चर्चांवर आता स्वतः महाराजांनीच मौन तोडले असून, 16 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

त्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांनी आपल्या आरोग्याविषयी बोलताना सांगितले की, “आम्ही इतके सीरियस नव्हतो, लोकांनी थोडं जास्तच केलं. अशा खोट्या बातम्या पसरवणे हा फक्त सामाजिक नाही, तर ‘भागवतिक अपराध’ सुद्धा आहे.”

महाराज पुढे म्हणाले, “जे लोक व्यूज आणि पैशांसाठी अशा खोट्या गोष्टी पसरवतात, त्यांनी समजून घ्यायला हवं की हजारो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. व्यूज तुम्हाला पैसे देऊ शकतात, पण अपराधातून मुक्त करू शकत नाहीत.”

हेही वाचा –‘100 कोटींचा टर्नओव्हर, 6 लाख जीएसटी आणि रॉल्स रॉयसचे स्वप्न!’, अखेर हा ‘वायरल रवी शर्मा’ आहे तरी कोण?

महाराजांनी सोशल मीडियावर कंटेंट बनवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की, “धार्मिक गोष्टींविषयी विनोद, खोटं किंवा अतिरंजित बोलणं पाप आहे. हा भावाचा खेळ आहे, गेम नाही.”

प्रेमानंद महाराजांनी पुढे भक्तांना आणि लोकांना देखील सल्ला दिला की, कोणतीही गोष्ट फॅक्ट-चेक न करता शेअर करू नका. असं केल्याने चुकीच्या माहितीमुळे समाजात गोंधळ आणि दुःख निर्माण होतं.

महाराजांनी सांगितलं की, “अशा चुकीच्या बातम्यांमुळे भक्तांच्या हृदयात वेदना निर्माण होतात, आणि त्या भावनांचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागतो. त्यामुळे सत्य आणि सकारात्मकता पसरवा. कारण धार्मिक जगतामध्ये खोटं बोलणं हे केवळ अपराध नाही, तर श्रद्धेचा अपमान आहे.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment