

OTT ban in India 2025 : भारत सरकारने OTT क्षेत्रात मोठा निर्णय घेत, उल्लू, ALTT (पूर्वी ALT Balaji), Desiflix, BigShots, HotHit, PrimePlay यांसारख्या २५ स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. या अॅप्सवर अश्लील आणि लैंगिक कंटेंटचे खुलेप्रमाणात प्रसारण केल्याचे निदर्शनास आले होते.
सरकारची कारवाई का झाली?
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) नागरिक आणि विविध संस्थांकडून या अॅप्सविरोधात अश्लीलतेच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चौकशीत समोर आले की, काही वेब सिरीज ‘कामुक’ या नावाखाली अत्यंत अश्लील दृश्ये दाखवत होत्या, ज्या IT नियम 2021 आणि IPC कलम 292/293 चा उल्लंघन करतात.
हेही वाचा – सिरीयसली, ‘ही’ वेबसीरीज पाहिली नाही, तर तुम्ही 2025 मधील बेस्ट थ्रिलर मिस करताय!
कायद्यानुसार काय बंधनं आहेत?
- IT Act 67 व 67A: इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रसारित करणं दंडनीय.
- IPC 292/293: अश्लील साहित्य वितरित/प्रदर्शित केल्यास शिक्षा.
- POCSO कायदा: बाल लैंगिक शोषणासंबंधी डिजिटल व भौतिक माध्यमावरील कंटेंटवर बंदी.
कोणते OTT अॅप्स बॅन झाले?
Ullu, ALTT, Desiflix, BigShots, PrimePlay, HotHit, Boombex, Navrasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalwa App, Feneo, ShowX, Soul Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchal App, MoodX, NeonX VIP, ShoHit, Phuggi, Mozflix, Triflix
एकूण २५ OTT अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
सेल्फ-रेग्युलेशनचा गैरवापर?
OTT अॅप्सना पूर्वी स्वयं-नियमन (Self-Regulation) ची मुभा देण्यात आली होती, मात्र अनेक अॅप्सने याचा गैरवापर करत कायद्याचे उल्लंघन केले.
बेकायदेशीर जुगार अॅप्सवरही कारवाई
तसेच सरकारने २०२२ ते जून २०२५ दरम्यान १५२४ बेकायदेशीर सट्टा आणि जुगार अॅप्स/वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. हे प्लॅटफॉर्म भारतीय कर व कायद्यानियमांचे पालन न करता काम करत होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!