आता झालं! WhatsApp ला टक्कर देणारं भारतीय अ‍ॅप मार्केटमध्ये उतरलंय!

WhatsApp Group

WhatsApp Alternative India Arattai App : आज जगभरातील मोठमोठ्या टेक कंपन्यांचं नेतृत्व भारतीयांकडे आहे. Microsoft, Google, Adobe, IBM यांसारख्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. मात्र, अजूनही एक गोष्ट आपल्या मनात घर करून बसलेली आहे. आपण आजतागायत WhatsApp किंवा Google सारखं वैश्विक स्तरावर यशस्वी ठरलेलं अ‍ॅप बनवू शकलो नाही.

पण आता Zoho या भारतीय कंपनीने एक नवा प्रयत्न केला आहे, Arattai अ‍ॅप. सोशल मीडियावर हे अ‍ॅप WhatsApp चं स्वदेशी पर्याय मानलं जातंय. पण हे खरंच WhatsApp ला रिप्लेस करेल का? की फक्त “casual chat” पुरतंच सीमित राहील?

Arattai म्हणजे नेमकं काय?

Arattai हा एक तामिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ “गप्पा मारणे” किंवा “चिटचॅट”. हे अ‍ॅप विकसित केलं आहे चेन्नईस्थित भारतीय कंपनी Zoho ने – हीच ती कंपनी ज्याचा उल्लेख IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘स्वदेशी प्रॉडक्ट वापरा’ मोहीमेत केला होता.

Zoho ही कंपनी मायक्रोसॉफ्टसारखी क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आणि बिझनेस टूल्स बनवते. याच कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी 1996 मध्ये सुरुवात केली होती. आता त्यांनीच Arattai सादर केलं आहे.

हेही वाचा – एशिया कपनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! दहशतवाद्यांच्या कुटुंबांना देणार मॅच फी? जाणून घ्या धक्कादायक सत्य!

Arattai चे खास फिचर्स

  • टेक्स्ट, वॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग सपोर्ट
  • स्टोरी, चॅनल, मीडिया शेअरिंगची सुविधा
  • Android, iOS, Desktop आणि Android TV साठी उपलब्ध
  • End-to-End Encryption (सध्या कॉलिंगसाठी, पण चॅटसाठी नाही)
  • मोबाईल नंबर किंवा @username ने लॉगिन करता येतं
  • कॅलेंडर इन्टीग्रेशन – मीटिंग डिटेल्स बघता येतात

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, Zoho स्पष्टपणे सांगते की यूजरचा डेटा कोणत्याही थर्ड पार्टीला विकला जाणार नाही आणि जाहिरातींसाठी वापरला जाणार नाही. हे खूप मोठं आश्वासन आहे, कारण बाकी अ‍ॅप्सचे उत्पन्नाचे मुख्य सोर्स हेच असते – आपला वैयक्तिक डेटा!

पण WhatsApp ला रिप्लेस करणं इतकं सोपं आहे का?

Arattai हा WhatsApp ला चॅलेंज करणारा पहिलाच अ‍ॅप नाही. यापूर्वीही Hike, Google Allo, Samsung ChatON, FireChat, HipChat, Hangouts, Koo अशा अनेक अ‍ॅप्सनी प्रयत्न केला. पण बहुतेक अयशस्वी ठरले.

WhatsApp केवळ एक मेसेजिंग अ‍ॅप राहिलेलं नाही. ते आपल्या जीवनशैलीचा भाग बनलं आहे – सरकारी सेवा, आधार, पॅन, शाळा, ऑफिस, वैयक्तिक गप्पा सगळं काही यावर चालतं. भारतात याचे 80 कोटींपेक्षा जास्त आणि जगभरात 300 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

म्हणून Arattai चं यश ठरेल का? हे भविष्यच ठरवेल. पण Zoho ने एक सकारात्मक, गोपनीयता-केंद्रित पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. “एक दगड जोरात फेकून तर बघा, आकाश फाटूही शकतं!”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment