Google Bug Bounty : आजच्या डिजिटल युगात Google AI हे नाव काही नवीन नाही. Gemini, Gmail, Google Drive, Workspace यांसारख्या ॲप्सचा आपण नेहमी वापर करतो. काही फीचर्ससाठी आपण पैसेही भरतो. पण हीच टेक्नॉलॉजी आता तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकते, आणि तीही एका “Bug” (किडा) मुळे!
होय, Google ने पुन्हा एकदा आपला Bug Bounty Program सुरु केला आहे. यामध्ये जर तुम्ही त्यांच्या AI आधारित कोणत्याही ॲपमध्ये (Gemini, Gmail, Drive, NotebookLM, Workspace इ.) काही “bug” म्हणजेच त्रुटी शोधून काढल्या, तर तुम्हाला थेट 30,000 डॉलर म्हणजे सुमारे 26 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळू शकतात!
Google Bug Bounty Program म्हणजे नेमकं काय?
Bug म्हणजे ॲपमधील तांत्रिक चूक, आणि Bounty म्हणजे त्या चुका शोधणाऱ्याला मिळणारं बक्षीस. जगभरातील टेक कंपन्या आपल्या ॲप्समध्ये असलेल्या सुरक्षेच्या त्रुटी शोधण्यासाठी हे प्रोग्राम राबवतात. कारण, जर हाच “bug” एखाद्या हॅकरच्या हाती लागला, तर वापरकर्त्यांची माहिती धोक्यात येऊ शकते.
कोणते ॲप्स आणि किती बक्षीस?
गुगलने स्पष्ट केलं आहे की, खालील AI आधारित ॲप्समध्ये जर गंभीर चूक सापडली, तर मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं जाईल:
- Gemini, Gmail, Drive, Workspace – ₹17 लाखांपर्यंत
- NotebookLM – ₹26 लाखांपर्यंत
काय शोधायचं?
तुम्ही शोधायला हवं:
- एखादं ॲप चुकीची किंवा खोटी माहिती देतंय का?
- तुमची खासगी माहिती दुसऱ्याला शेअर करतंय का?
- AI प्रॉम्प्ट्स चुकीचे, वादग्रस्त, धोकादायक उत्तरं देतात का?
- जीमेल चुकीचं मेल पाठवतंय का?
- किंवा Data Leak होतंय का?
जर असं काही सापडलं, तर तुम्ही त्या त्रुटीचा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करून Google Bug Hunter Website वर सबमिट करू शकता.
कोणत्या चुका मान्य केल्या जाणार नाहीत?
जर तुम्ही मुद्दामहून AI ला फसवण्यासाठी फसवे प्रश्न विचारले, आणि त्यावरून उत्तरं घेतली, तर ती bug म्हणून स्वीकारली जाणार नाहीत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा