+IPL 2026 Auction : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2026 साठीचा मिनी ऑक्शन डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार 13 ते 15 डिसेंबर 2025 हा काळ या बहुचर्चित लिलावासाठी राखून ठेवला जाऊ शकतो.
गेल्या दोन हंगामांप्रमाणेच या वर्षीही लिलाव विदेशात होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये दुबई आणि 2024 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दा येथे लिलाव पार पडला होता. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे — या वेळीही बीसीसीआय परदेशातच ऑक्शन ठेवणार का, की IPL लिलाव पुन्हा भारतात परतणार आहे?
खेळाडू टिकवण्याची अंतिम तारीख – 15 नोव्हेंबर
Cricbuzz च्या अहवालानुसार, खेळाडू टिकवण्याची (retention) अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवायच्या आणि लिलावासाठी सोडायच्या खेळाडूंचा निर्णय घेण्यासाठी सुमारे एका महिन्याचा अवधी मिळणार आहे.
🚨 IPL AUCTION UPDATE. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2025
– Auction to be held around 13-15th December.
– 15th November set to be the deadline to finalise retention. (Cricbuzz). pic.twitter.com/hL9f4PYu1a
हेही वाचा – Viral Video : स्टेजवर चाहत्याला झोपेतून उठवलं…; राघव जुयालच्या एका छोट्याशा कृतीने जिंकली लाखोंची मनं!
हा काळ प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील हंगामात कोणत्या खेळाडूंवर टीम अवलंबून राहील, हे याच निर्णयावर ठरणार आहे.
गेल्या वर्षीची परिस्थिती आणि यंदाचा बदल
गेल्या वर्षी जेद्दा येथे झालेला लिलाव मेगा ऑक्शन होता. त्यावेळी प्रत्येक संघाला फक्त मर्यादित खेळाडू टिकवण्याची परवानगी होती.
- मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी प्रत्येकी पाच खेळाडू टिकवले होते, तसेच राइट टू मॅच (RTM) पर्यायही ठेवला होता.
- कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने तर सहा खेळाडूंना ठेवून धाडसी निर्णय घेतला होता.
- दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज यांनी संघात मोठे बदल करत अनुक्रमे तीन आणि दोनच खेळाडू ठेवले.
अखेर या दोन संघांनीच IPL 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला, जिथे RCB ने सहा धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच IPL ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
यंदा मिनी ऑक्शन – पण चेन्नईकडून मोठे बदल?
या वर्षी मात्र मिनी ऑक्शन असल्याने संघांना बहुतेक खेळाडू टिकवता येतील. या प्रकारच्या लिलावात मोठे बदल न करता, फक्त कमकुवत जागा भरून काढण्यावर भर दिला जातो.
मात्र, अहवालांनुसार चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या वेळी सर्वाधिक बदल करू शकते. 18 हंगामांमध्ये प्रथमच तळाच्या क्रमांकावर पोहोचल्यामुळे CSK अनेक खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा