Viral Video : स्टेजवर चाहत्याला झोपेतून उठवलं…; राघव जुयालच्या एका छोट्याशा कृतीने जिंकली लाखोंची मनं!

WhatsApp Group

Raghav Juyal And Sleeping Fan Viral Video : आपल्या हटके डान्स स्टाइल आणि मिश्कील स्वभावासाठी ओळखला जाणारा अभिनेता आणि डान्सर राघव जुयाल सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर गाजत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका इंटरव्ह्यू दरम्यान झोपलेला फॅन सौम्यपणे उठवताना दिसतो. हा नाजूक क्षण राघवच्या डाउन टू अर्थ आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचं उत्तम उदाहरण ठरत आहे.

युवा कॉन्क्लेवमध्ये घडला अनपेक्षित प्रसंग

‘युवा कॉन्क्लेव 2.0’ या कार्यक्रमात राघव जुयाल उपस्थित होता. त्याचं सेशन ““अक्खा बॉलीवुड एक तरफ और राघव जुयाल एक तरफ!” या हटके शीर्षकासह आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये राघवने आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल आणि जीवनाबाबतच्या तत्त्वज्ञानाबद्दल मनमोकळं बोलताना, समोरच्या रांगेत बसलेला एक युवक झोपलेला असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सुपरस्टारचं वागणं

सामान्य सेलिब्रिटी असता, तर कदाचित रागावला असता. पण राघवने त्याच्या शाहरुख खानसदृश सौम्य स्वभावाने त्या झोपलेल्या चाहत्याला प्रेमाने उठवलं आणि त्याला मिठी मारली. हा संपूर्ण प्रसंग अनस्क्रिप्टेड होता, पण प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसा उमटवणारा ठरला. संपूर्ण हॉलमध्ये हास्याचे फवारे उडाले.

हेही वाचा – देशातील पहिला 8-लेन बोगदा तयार! अवघ्या 60 मिनिटांत 3 तासांचा प्रवास

राघवचा विनोदी अंदाज

राघव त्या प्रसंगानंतर हसत म्हणाला, “अरे त्याला उठू तरी द्या… ब्रश करेल, बाथरूमला जाईल… थोडा वेळ द्या यार… मगरळ झटकेल!” या एका वाक्याने सारा हॉल अजूनच फिदा झाला. राघवचं सहज आणि खमंग भाष्य या प्रसंगाला अजूनच खास बनवत गेलं.

नेटिझन्स म्हणाले, ‘खरा शाहरुख खान हाच!’

हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. एका युजरने लिहिलं, “हा माझ्या शिक्षकांसारखा वाटतो, जे मला नेहमी झोपेतून उठवत होते!” दुसरा म्हणाला, “हा खराखुरा शाहरुख खानचा उत्तराधिकारी होऊ शकतो!” राघवच्या नम्रतेमुळे आणि चाहत्यांप्रती प्रेमामुळे त्याची तुलना थेट बॉलिवूड बादशाह शाहरुख खानशी केली जाऊ लागली आहे.

‘द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड’ नंतर आता ‘द पॅराडाइज’

राघवने नुकत्याच प्रदर्शित ‘द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड’ मध्ये दमदार अभिनय सादर केला होता. आता तो ‘द पॅराडाइस’ या पॅन-इंडिया प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथचा सुपरस्टार नानी आहे आणि दिग्दर्शक आहेत श्रीकांत ओडेला. ही बहुप्रतीक्षित फिल्म मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. राघव जुयाल सध्या ज्या गतीने लोकप्रियतेच्या शिखराकडे झेपावत आहे, ते पाहता त्याला बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment