देशातील पहिला 8-लेन बोगदा तयार! अवघ्या 60 मिनिटांत 3 तासांचा प्रवास

WhatsApp Group

India 8 lane Tunnel : देशात रस्ते, एक्सप्रेसवे आणि बोगद्यांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. आता देशाला मिळणार आहे एक अनोखा तांत्रिक चमत्कार – पहिलाच 8-लेन असलेला भुयारी बोगदा, जो दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बनवली जात आहे. हा बोगदा पूर्णत्वास आल्यावर वाहनचालकांना केवळ सुरक्षित आणि आरामदायक प्रवासच नाही, तर वेळेची प्रचंड बचत देखील होणार आहे.

कुठे बनतोय हा अत्याधुनिक बोगदा?

हा भुयारी बोगदा कोटा-दिल्ली रूटवर मुकुंदरा हिल्स भागात बनवला जात आहे. हे क्षेत्र राजस्थानातील टायगर रिझर्वसाठी प्रसिद्ध आहे. बोगद्याची एकूण लांबी सुमारे 5 किमी असून, ती 22 मीटर रुंद आहे. प्रत्येक दिशेसाठी 4-लेन वाहतूक व्यवस्था आहे.

या प्रकल्पाचा एकूण पॅकेज नंबर 10 असून याची एकूण लांबी 26.5 किमी आहे. बोगद्याच्या बाहेरून सध्या वाहनांना मुकुंदरा डोंगररांग पार करण्यासाठी सवाईमाधोपूरमार्गे 60 किमीचा वळसा घ्यावा लागतो. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात होते. आता हा बोगदा पूर्ण झाल्यावर वाहनांना थेट कोटा पर्यंतचा सोपा आणि सरळ मार्ग मिळणार आहे.

120 किमी प्रतितास वेग आणि पर्यावरणपूरकही!

हा बोगदा पूर्णपणे अत्याधुनिक आणि सुरक्षित अशा तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे. यातून गाड्या 120 किमी/तास वेगाने सहज धावू शकतात. सर्वात विशेष बाब म्हणजे, टायगर रिझर्वच्या नैसर्गिक अधिवासाला कोणतीही हानी न पोहोचवता हा बोगदा तयार केला गेला आहे.

बोगद्याच्या वरच्या भागातून अजूनही जंगली प्राणी मोकळेपणाने फिरू शकतील, तर खालून गाड्या वेगाने धावतील. आवाजाचा त्रास जंगल परिसरात जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – एका तिकीटात लोकल-मेट्रो-बेस्ट? मोदींनी मुंबईकरांना दिली भन्नाट भेट!

हायटेंशन लाइन बनली अडथळा, पण…

सिमालिया ते फागी या भागातील हायटेंशन लाईनमुळे प्रकल्पात काही अडचणी आल्या होत्या. या लाईन हटवण्यासाठी सरकारकडून शटडाउनची आवश्यकता होती. पावसामुळे काही काळ काम थांबले होते, पण आता ते अंतिम टप्प्यात आहे.

नवंबर 2025 पर्यंत बोगदा पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

बोगदा ओलांडताच गुजरात सीमेत प्रवेश!

या भुयारी मार्गाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे बोगदा पार करताच वाहनं थेट गुजरातच्या हद्दीत पोहोचतील. यामुळे दिल्ली ते गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने होणारा प्रवास आणखीनच जलद होणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment