एका तिकीटात लोकल-मेट्रो-बेस्ट? मोदींनी मुंबईकरांना दिली भन्नाट भेट!

WhatsApp Group

Mumbai One Ticket App : मुंबईकरांसाठी दिवाळीपूर्वीच एक आनंदाची बातमी आहे. आता लोकल, मेट्रो, बसच्या वेगवेगळ्या तिकिटांच्या झंझटीतून सुटका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘Mumbai OneTicket’ अ‍ॅपचा अधिकृत शुभारंभ केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबईतील प्रवास अधिक सोपा, जलद आणि स्मार्ट होणार आहे.

‘OneTicket’ अ‍ॅप म्हणजे काय?

हे एक डिजिटल अ‍ॅप्लिकेशन आहे, जे Open Network for Digital Commerce (ONDC) च्या नेटवर्कवर आधारित आहे. यामध्ये एकाच अ‍ॅपमधून मुंबई मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन आणि बस सेवा यांचे तिकीट घेता येईल. एकाच तिकीटवर संपूर्ण मुंबईभरचा प्रवास शक्य होणार आहे.

हेही वाचा – एका चुकीनं खात्यात आले दीड कोटी! चक्क कोर्टाने सांगितलं, पैसे परत द्यायचे नाहीत!

वेगवेगळ्या तिकिटांचा गोंधळ संपणार

आत्तापर्यंत मुंबईत प्रवास करताना वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळी तिकिटं घ्यावी लागत होती – कधी लोकल स्टेशनवर रांगेत उभं राहावं लागतं, कधी मेट्रोच्या टोकनसाठी वेटिंग. पण आता या अ‍ॅपमुळे फक्त एकाच अ‍ॅपवरून सगळ्या तिकिटांची सोय झाली आहे. त्यामुळे वेळेची आणि श्रमांची बचत होणार आहे.

या सेवांचा समावेश आहे –
OneTicket अ‍ॅपमध्ये खालील सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत:

  • मुंबई मेट्रो लाईन 1, 2A, 3, आणि 7
  • मुंबई मोनोरेल
  • नवी मुंबई मेट्रो
  • मुंबई लोकल ट्रेन
  • BEST बस सेवा
  • ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, आणि नवी मुंबई महानगर परिवहन

सध्या मुंबई मेट्रोची लांबी जवळपास 70 किमी आहे आणि वेगवेगळ्या ऑपरेटरमुळे प्रवाशांना तिकिट घेण्यात अडचणी येत होत्या. या अ‍ॅपने ती समस्या दूर होणार आहे.

अ‍ॅपचा वापर कसा करावा?

  1. अँड्रॉइड वापरकर्ते Google Play Store वरून ‘OneTicket’ अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.
  2. iPhone वापरकर्त्यांनी Apple App Store वरून ‘OneTicketIndia’ नावाने अ‍ॅप शोधावे.
  3. मोबाईल नंबरद्वारे साइन अप करा.
  4. प्रवासाचा प्रारंभ आणि समाप्त स्टेशन निवडा.
  5. तिकीटांची संख्या निवडून UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करा.
  6. QR कोड मिळेल – तो मेट्रो गेटवर स्कॅन करून प्रवेश मिळवा.

अ‍ॅपमध्ये मिळणार्‍या इतर महत्त्वाच्या सुविधा –

  • रिअल टाइम अपडेट्स
  • ट्रेन डिलेची माहिती
  • पर्यायी मार्गांची माहिती
  • SOS बटनद्वारे आपत्कालीन सुरक्षा

हे अ‍ॅप केवळ तिकीटपुरते मर्यादित नाही, तर प्रवास अधिक सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनवतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment