एका चुकीनं खात्यात आले दीड कोटी! चक्क कोर्टाने सांगितलं, पैसे परत द्यायचे नाहीत!

WhatsApp Group

Salary Credit Mistake : कधी तुमच्या डोक्यात विचार आला आहे का की, “आपल्या खात्यात चुकून काही कोटी रुपये जमा झाले तर?” मग पुढचं आयुष्य मौजमजेत जाईल! पण चिली (दक्षिण अमेरिका) देशात एका व्यक्तीसोबत असंच खरंच घडलं. एका कंपनीनं त्याच्या मासिक पगाराच्या 300 पट जास्त रक्कम – जवळपास दीड कोटी रुपये – चुकून क्रेडिट केली. आणि महत्त्वाचं म्हणजे, कोर्टानं तो पैसे परत करण्यास नकार दिला आहे!

ही घटना 2022 मधली आहे. ‘डॅन कंसोर्सियो इंडस्ट्रियल डे एलिमेंटोस डे’ नावाची चिलीतील एक प्रसिद्ध फूड कंपनी आहे. या कंपनीत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मासिक पगार फक्त 46,000 रुपये होता. मात्र पेरोल सिस्टममधील चुकांमुळे मे 2022 मध्ये त्याच्या खात्यात चक्क 1 कोटी 51 लाख 88 हजार रुपये जमा झाले.

सुरुवातीला कर्मचाऱ्यानं ही रक्कम परत करायचं मान्य केलं होतं. पण तीन दिवसांनी त्याने राजीनामा दिला आणि बॉसचे कॉल घेणंही बंद केलं! कंपनीनं तात्काळ कायदेशीर कारवाई करत चोरीचा आरोप दाखल केला.

हेही वाचा – फक्त एक ‘किडा’  शोधा आणि 26 लाख मिळवा! तुम्हीही कमवू शकता…

3 वर्षांची कोर्ट केस, पण निकाल कर्मचाऱ्याच्या बाजूने

या प्रकरणात तब्बल तीन वर्षं कायदेशीर लढा सुरू होता. अखेर सॅंटियागो येथील कोर्टानं निर्णय दिला की ही रक्कम “अनधिकृत संग्रह” (unauthorised collection) आहे, चोरी नव्हे. त्यामुळे गुन्हेगारी स्वरूपात ही केस चालवता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्याला गुन्हेगारी आरोपातून मुक्तता मिळाली. मात्र, कंपनीनं हे प्रकरण सिव्हिल केस म्हणून पुढे चालवण्याची तयारी दर्शवली असून कोर्टाच्या निर्णयाविरोधात पुनरावलोकनासाठी अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment