जगातील पहिली AI मंत्री, ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय, भ्रष्टाचारविरोधात जबाबदारी

WhatsApp Group

World First AI Minister : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान आता फक्त उद्योग, शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता ते राजकारण आणि प्रशासनामध्येही प्रवेश करत आहे. जगातील पहिल्यांदाच एका देशाने AI आधारित मंत्रीची नियुक्ती केली आहे, आणि तो देश आहे अल्बानिया.

‘डिएला’ – AI मंत्रीची अनोखी संकल्पना

अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात AI जनरेटेड व्हर्च्युअल मंत्री ‘डिएला’ ची नियुक्ती केली आहे. डिएला ही शारीरिक स्वरूपात अस्तित्वात नसलेली, परंतु अत्याधुनिक AI तंत्रज्ञानावर आधारित एक डिजिटल मंत्री आहे. “डिएला” या नावाचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो – आणि खरंच ती देशाच्या प्रशासनात प्रकाश टाकणारी ठरणार आहे.

पंतप्रधान रामा यांनी स्पष्ट केलं की, डिएला सरकारच्या प्रत्येक ठेकेमध्ये 100% पारदर्शकता आणण्यासाठी मदत करेल. तिच्या माध्यमातून सरकारी कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार पूर्णतः रोखण्याचा सरकारचा मानस आहे.

डिजिटल असिस्टंट ते मंत्री पदापर्यंतचा प्रवास

डिएलाने सुरुवात केली होती एक डिजिटल AI असिस्टंट म्हणून, जानेवारी 2025 मध्ये. तिला पारंपरिक अल्बानियन पोशाख घातलेल्या महिलेप्रमाणे तयार केलं गेलं आहे. तिचं प्रमुख उद्दिष्ट होतं नागरिकांना ई-अल्बानिया पोर्टलवर सेवा आणि कागदपत्रे शोधायला मदत करणं. आतापर्यंत डिएलाने 36600 डिजिटल डॉक्युमेंट्स जनरेट करण्यात मदत केली असून, 1000 हून अधिक सेवा पुरविल्या आहेत.

हेही वाचा – विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली; 86 जणांचा मृत्यू, गावागावात शोककळा!

भ्रष्टाचारविरोधातील लढाई

अल्बानियामध्ये सरकारी ठेक्यांमधील भ्रष्टाचार ही दीर्घकालीन समस्या आहे. अंतरराष्ट्रीय ड्रग्स आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांसाठी अल्बानिया हे हब बनल्याचे अहवाल सांगतात. त्यामुळे पंतप्रधान रामा यांच्यावर भ्रष्टाचार संपवण्याची मोठी जबाबदारी आहे.

संविधानात AI मंत्रीला स्थान?

AI मंत्री म्हणजेच डिएलाची नियुक्ती कायदेशीर आहे का, असा प्रश्न अनेक पत्रकारांनी विचारला. अल्बानियाचे राष्ट्रपती बाजराम बेगाज यांनी यावर थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र पंतप्रधान रामा यांची सोशलिस्ट पार्टी ८३ जागा जिंकून सत्तेत आली असून, ते संसदेत बहुमताच्या जोरावर मंत्रीमंडळ स्थापणार आहेत.

अल्बानियाचा EU मध्ये प्रवेशाचा प्रयत्न

सोशलिस्ट पार्टीचा दावा आहे की 2027 पर्यंत अल्बानिया युरोपियन युनियन (EU) मध्ये सामील होईल. मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की देश अजून तयार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील ही नवी AI योजना, EU सदस्यत्वासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय पारदर्शकतेचा एक भाग म्हणूनही पाहिली जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment