विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली; 86 जणांचा मृत्यू, गावागावात शोककळा!

WhatsApp Group

Congo boat Accident : उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील काँगो देशाच्या इक्वेटर प्रांतातील बसानकुसु परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी बोट दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान 86 नागरिकांचा मृत्यू झाला असून, बहुतांश मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ही घटना एका मोटरचालित बोट उलटल्यामुळे घडली. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व सामान लादण्यात आलं होतं. ही बोट रात्रीच्या वेळी नदी ओलांडत होती, त्याचवेळी तिचा तोल ढासळून ती नदीत उलटली.

मृत्यू आणि बचाव कार्याची भीषणता

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत 86 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अनेकजण अद्यापही बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरूच असून, स्थानिक प्रशासन, बचाव पथक आणि नदीकाठच्या गावांतील रहिवासीही या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा – चीनचं टॉयलेट बनलं ‘टूरिस्ट हॉटस्पॉट’, पाहिलं की तुम्हीही फोटो काढायला लावाल!

विद्यार्थी वर्गावर काळाचा घाला

या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृतांपैकी बहुतेकजण विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी आपल्या गावांमधून शिक्षणासाठी इतर शहरांकडे प्रवास करत होते. या दुर्घटनेमुळे गावागावांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राज्य माध्यमांच्या मते, या दुर्घटनेसाठी बोटीतील अयोग्य मालवाहतूक व रात्रीचा धोकादायक प्रवास जबाबदार आहे. काँगोमध्ये याआधीही अशा घटना घडल्या असून, अनेकदा ओव्हरलोडिंग आणि सुरक्षा नियमांची पायमल्ली हीच कारणीभूत ठरते.

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे स्थायी उपाययोजना आणि जनजागृतीची गरज अधोरेखित होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment