“मी तुझ्यासाठी पत्नीचा खून केला आहे”, बेळगावातील डॉक्टरचा धक्कादायक गुन्हा, संशयास्पद मेसेज उघडकीस!

WhatsApp Group

Bengaluru Doctor Murder : बंगळुरूतील एका डॉक्टरने स्वतःच्या पत्नीचा खून केल्यानंतर अनेक महिलांना “मी तुझ्यासाठी पत्नीचा खून केला” असा थरकाप उडवणारा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक तपशील उघड झाला आहे. हा मेसेज त्याने PhonePe व्यवहाराच्या नोट्स मध्ये लिहून पाठविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र रेड्डी (सर्जन) असून त्याने पत्नी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कृतिका एम. रेड्डी हिला भूल देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात त्याला अटक केली.

व्यवहाराच्या नोट्समधून पाठवले मेसेज

पोलीस तपासानुसार, महेंद्रने किमान चार ते पाच महिलांना हा धक्कादायक मेसेज पाठवला होता. यात एक महिला डॉक्टरही होती, जिने याआधी त्याचा प्रस्ताव नाकारला होता. आरोपीने मोबाईल व लॅपटॉपचे डेटा उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र FSL तपासात सर्व माहिती बाहेर आली.

विवाहानंतर काही महिन्यांतच शोकांतिका

दोघांचे मे 2024 मध्ये लग्न झाले होते. कृतिका आरोग्याच्या कारणामुळे आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. एप्रिल 2025 मध्ये महेंद्र तिला उपचारांच्या नावाखाली दोन दिवस इंजेक्शन देत होता. अचानक तब्येत बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय होता. मात्र कृतिकाच्या बहिणी डॉ. निकिता एम. रेड्डी हिने पोलिसांकडे लिखित तक्रार देत सखोल तपासाची मागणी केली.

Propofol औषधाचा वापर सिद्ध

सहा महिन्यांच्या FSL तपासानंतर कृतिकाच्या शरीरात Propofol हे भूल देणारे औषध आढळले. हे औषध सामान्यत: ऑपरेशन थिएटरमध्येच वापरले जाते. त्यामुळे हा नियमित उपचार नसून नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले.

हे प्रमाण सिद्ध झाल्यानंतर प्रकरण भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 – खून या अंतर्गत नोंदवण्यात आले आणि महेंद्रला मणिपाल, उडुपी येथून अटक करण्यात आली.

आरोपीच्या कुटुंबावरही गुन्हेगारी संशय

तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. महेंद्रच्या जुळ्या भावावर 2018 मध्ये फसवणूक व गुन्हेगारीचे आरोप होते. तर महेंद्र व दुसरा भाऊ राघवा रेड्डी यांच्यावर 2023 मध्ये धमकी देण्याचा गुन्हा नोंद होता. कृतिकाच्या कुटुंबाचा आरोप आहे की विवाहाच्या वेळी ही माहिती लपवण्यात आली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment