Gold Price Drop India : सोन्याचे दर कोसळले! एक तोळ्याच्या भावात ₹4,100 ची घसरण; चांदीही पडली!

WhatsApp Group

Gold Price Drop India : दिवाळीला फक्त नऊ दिवस झाले आणि त्यानंतरपासून सोन्याच्या बाजारात धडाधड घसरण सुरू आहे. सोन्यात सलग घसरण पाहायला मिळत असून बुधवारी सोन्याचा भाव तब्बल ₹4,100 प्रति तोळा खाली आला. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्‍या किमतीत तब्बल ₹11,000 ची पडझड झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी केलेल्या लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नवीन दरानुसार सोन्याचा भाव आता ₹1,21,800 प्रति तोळा (सर्व करांसह) नोंदवला गेला आहे. तर ग्लोबल मार्केटमध्येही सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराेत सोने $4,000 प्रति औंस या महत्त्वाच्या पातळीखाली घसरले असून, हे तीन आठवड्यातील सर्वात कमी स्तर आहे. हाजिर सोना सुमारे $94.36 (2.37%) ने घसरून $3,887 प्रति औंसवर आला आहे.

चांदीतही जाळ! 1 दिवसात ₹6,250 ने घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी पडझड दिसली. दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत ₹6,250 प्रति किलो ने घसरली असून आता दर ₹1,45,000 प्रति किलोवर आला आहे. सोमवारी चांदीचा दर ₹1,51,250 प्रति किलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीतही जवळपास 3% घसरण नोंदली गेली असून चांदीचा दर $45.56 प्रति औंसवर आहे.

किंमती का घसरत आहेत?

विशेषज्ञांच्या मते, अमेरिका–चीन व्यापार तणावात काही प्रमाणात घट, जागतिक अर्थस्थिती सुधारण्याची शक्यता आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल कमी होत आहे. यामुळे सोन्यात विक्री वाढली असून दर कोसळत आहेत.

या वर्षी सोन्याच्या किमतीत 50% पेक्षाही जास्त वाढ झाल्यानंतर मोठे गुंतवणूकदार नफा बुक करत असल्याने किंमतीत आणखी दबाव तयार झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही दिवसांत सोन्यात आणखी 5-10% घसरण होऊ शकते.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला

  • सध्या घाईत गुंतवणूक करू नका
  • किंमती स्थिर होईपर्यंत थांबणे शहाणपणाचे
  • लहान प्रमाणात गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्डचा पर्याय ठेवावा

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment