Indian Railways Lower Berth Rules 2025 : कोणाला मिळेल खालची सीट? झोपण्याचा वेळ, बुकिंग अटी आणि पूर्ण माहिती

WhatsApp Group

Indian Railways Lower Berth Rules 2025 : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गेल्या काही महिन्यांत मोठे बदल लागू केले आहेत. तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी करणे, तक्रारी कमी करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने यावर्षी रेल्वेने RailOne नावाचे सुपर-अॅप लाँच केले. या अॅपद्वारे प्रवासी आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटे सहज बुक करू शकतात. रेल्वे प्रवासाशी संबंधित अनेक सेवा या एकाच अॅपमध्ये उपलब्ध आहेत.

याशिवाय, भारतीय रेल्वेने आरक्षित तिकिटांसाठी असलेला Advance Reservation Period (ARP) 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणला आहे. त्यामुळे प्रवासापूर्वी तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

परंतु मोठा प्रश्न असा की लोअर बर्थ प्राधान्य देऊनही प्रवाशांना अनेकदा साइड अपर किंवा अपर बर्थ का मिळते? याचे उत्तर रेल्वेच्या ‘लोअर बर्थ अलोकेशन’ नियमांमध्ये आहे.

कोणाला मिळते लोअर बर्थची प्राधान्याने तरतूद?

भारतीय रेल्वेच्या संगणकीय बुकिंग प्रणालीमध्ये पुढील प्रवाशांना स्वयंचलित लोअर बर्थ देण्याची तरतूद आहे (सीट उपलब्धतेवर आधारित):

  • ज्येष्ठ नागरिक (पुरुष व महिला दोघेही)
  • 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवासी
  • गर्भवती महिला

जर बुकिंगच्या वेळी लोअर बर्थ उपलब्ध नसेल आणि वरिष्ठ नागरिक किंवा गर्भवती महिला यांना मध्य वा वरची बर्थ मिळाली, तर ट्रेनमधील टीटीईला उपलब्ध झालेली लोअर बर्थ त्यांना देण्याचा अधिकार आहे.

‘फक्त लोअर बर्थ मिळाल्यासच तिकीट बुक’

ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांनी ‘Book only if lower berth available’ हा पर्याय निवडू शकतात.
हा पर्याय निवडल्यास लोअर बर्थ उपलब्ध नसल्यास तिकीट बुकच होत नाही. ज्येष्ठ नागरिक किंवा आरोग्य कारणांमुळे लोअर बर्थ हवी असणाऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत उपयोगी आहे.

लोअर बर्थ झोपण्याची वेळ : रेल्वेचे स्पष्ट नियम

आरक्षित डब्यांमध्ये झोपण्यासाठी ठराविक वेळ आहे :

रात्र 10:00 ते सकाळी 6:00 — फक्त झोपण्यासाठी बर्थ वापरता येते.

बाकी वेळेत सीट सर्व प्रवाशांनी बसण्यासाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे.

RAC (Reservation Against Cancellation) प्रवाशांच्या बाबतीत:

  • साइड लोअर सीट दिवसा दोघांनी मिळून बसण्यासाठी असते (RAC आणि साइड अपर प्रवासी)
  • मात्र रात्री 10 ते सकाळी 6 लोअर बर्थ पूर्णपणे लोअर बर्थ धारकासाठीच

म्हणजेच, साइड अपर बर्थ असलेल्या प्रवाशाला रात्री लोअर बर्थ वापरण्याचा कोणताही अधिकार नाही.

महत्त्वाच्या टिप्स (प्रवाशांसाठी)

  • लोअर बर्थ हवी असल्यास “Lower berth only” पर्याय निवडा
  • ज्येष्ठ नागरिकांनी वयाचे पुरावे जवळ ठेवा
  • रात्रीच्या वेळेचे नियम पाळा — वाद टाळा
  • RAC प्रवाशांसोबत सीट शेअरिंगचे नियम जाणून घ्या

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment