

Home Remedies for Mouth Ulcer : उन्हाळा असो किंवा हिवाळा, तोंडामध्ये अल्सर अनेकदा होतात. ज्यामुळे आपण काही खाऊ किंवा पिऊ शकत नाही. तोंडात काही टाकताच जळजळ आणि तीव्र वेदना होतात. हे सहसा जीभ, हिरड्या, ओठांवर, तोंडाच्या आत किंवा घशात आढळतात. ही समस्या अगदी सोपी वाटत असली तरी यावर वेळीच उपचार न केल्यास ही मोठी समस्या बनू शकते. अनेक कारणांमुळे फोड येऊ शकतात. काही वेळा शरीरातील उष्णता वाढल्यानेही फोड येतात. पण वारंवार तोंडावर फोड येणे हे देखील मोठ्या समस्येचे कारण असू शकते. त्यामुळे जर तुम्हीही तोंडाच्या अल्सरने त्रस्त असाल आणि घरगुती उपाय शोधत असाल तर खाली काही उपाय आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही त्यावर मात करू शकता.
तोंड येण्याच्या समस्येपासून घरगुती उपाय (Mouth Ulcer Home Remedies)
1. ब्लॅक टी
तोंडाचे व्रण दूर करण्यासाठी तुम्ही काळ्या चहाचा वापर करू शकता. काळ्या चहासोबत थेट घेतल्यास फोडांपासून आराम मिळतो. काळ्या चहामध्ये असलेले टॅनिन बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देतात. यासाठी तुम्हाला चहाची पिशवी एक कप गरम पाण्यात भिजवावी लागेल आणि काही वेळाने पिशवी थंड झाल्यावर फोडांवर लावा. यामुळे अल्सरपासून आराम मिळेल.
2. दही
दही हे प्रोबायोटिक आहे जे आतड्यांसाठी चांगले मानले जाते. तोंडाच्या फोडांपासून सुटका हवी असेल तर दह्याचे सेवन करू शकता. दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो जो अल्सरची जळजळ कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
हेही वाचा – शाळेच्या बाईंना आयडिया आली आणि त्यांनी 330 कोटींची कंपनी उभारली!
3. लवंग
लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि वेदनाशामक गुणधर्म फोडाचे जंतूंपासून संरक्षण करतात, ते लवकर बरे होण्यास मदत करतात आणि वेदनापासून आराम देतात.
4.तूपाने मिळेल आराम
तूपाचा उपाय सुद्धा तोंडातील फोडाची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानला जातो. जेव्हा तुम्ही तोंडातील फोडाने हैराण व्हाल तेव्हा त्यावर तूप लावून झोपा. सकाळी उठल्यावर तुम्हाला तोंडातील फोड कमी झालेले दिसेल.
5. वेलची-मध फायदेशीर
तोंडात फोड आल्यावर वेलची-मध हा उपाय फायदेशीर ठरतो. याचा वापर करण्यासाठी हिरवी वेलची बारीक करून त्यात थोडं मध टाका आणि मग ते फोडावर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. काही वेळ ही पेस्ट लावूनच ठेवा नंतर पाण्याने गुळण्या करा. याने वेदना दूर होईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!