ताम्हिणी घाटात थरकाप उडवणारा अपघात! चालत्या कारच्या सनरुफवर दगड कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

WhatsApp Group

Tamhini Ghat Accident  : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. घाटातून जात असलेल्या कारवर अचानक डोंगरातून मोठा दगड कोसळला. हा दगड थेट कारच्या सनरूफमधून आत शिरला आणि पुढच्या सीटवर बसलेल्या महिलेच्या डोक्यावर जबरदस्त आदळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेची ओळख स्नेहल गुजराती (वय 43) अशी झाली आहे. त्या आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून माणगावच्या दिशेने Volkswagen Virtus कारने प्रवास करत होत्या. हा अपघात कोंडीथर गावाजवळ झाला, जो ताम्हिणी घाटातील अतिशय धोकादायक वळणांचा भाग म्हणून ओळखला जातो.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार घाटातील एका अरुंद वळणावरून जात असताना अचानक डोंगराचा एक भाग तुटला आणि काही दगड रस्त्यावर कोसळले. त्यापैकी एक मोठा दगड वेगाने खाली आला आणि कारच्या सनरूफला फोडून आत घुसला. दगड थेट स्नेहल यांच्या डोक्यावर आदळला.

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तेथेच मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून घाट परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे माती व दगड सरकण्याचा धोका वाढला आहे व या घटनेतून पुन्हा एकदा ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा – दिल्लीत सर्वात मोठी रिअल इस्टेट डील, ₹380 कोटींना 4 फ्लॅट्स! कोण आहे हा माणूस?

शिरडीहून परतणाऱ्या साईं भक्तांच्या गाडीचा अपघात; तिघांचा मृत्यू

याचदरम्यान, शिरडी साईबाबांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भक्तांच्या गाडीचा नाशिकच्या येवला तालुक्यात भीषण अपघात झाला. एरंडगाव रायते शिवरात येथे फॉर्च्युनर कार नियंत्रण सुटून पलटी मारली. या अपघातात तिघांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.

घाट मार्गावरील प्रवाशांना आवाहन

ताम्हिणी घाट, आंबे घाट, भोर घाट अशा पावसाळ्यात धोकादायक बनणाऱ्या मार्गांवर वाहनचालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करताना गती नियंत्रणात ठेवणे, अत्यावश्यक असल्यासच प्रवास करणे व हवामान सतर्कता पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment