फक्त 19 व्या वर्षी मुंबईच्या या तरुणाने बनवलं AI स्टार्टअप! Google आणि DeepMind चे दिग्गज झाले फॅन!

WhatsApp Group

Dhravya Shah Supermemory AI : मुंबईचा 19 वर्षीय तरुण ध्रव्य शाह आज जगभर चर्चेत आला आहे. ज्या वयात बहुतेक तरुण कॉलेजच्या अ‍ॅडमिशन, परीक्षांच्या तयारीत किंवा करिअरबद्दलच्या चिंतेत अडकलेले असतात, त्या वयात ध्रव्यने ‘Supermemory’ नावाचं क्रांतिकारी AI Startup उभारून जगाला चकित केलं आहे.

ध्रव्य सध्या Supermemory या कंपनीचा CEO आहे, आणि विशेष म्हणजे या कंपनीने 30 लाख डॉलर (सुमारे ₹25 कोटी) इतकी प्रचंड प्रारंभीक फंडिंग उभारली आहे. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टला Google च्या AI विभागाचे प्रमुख Jeff Dean आणि DeepMind चे Logan Kilpatrick यांसारख्या जगप्रसिद्ध टेक लीडर्सनी थेट पाठिंबा दिला आहे.

Supermemory म्हणजे नेमकं काय?

आजच्या काळात ChatGPT किंवा Google Gemini सारखी AI मॉडेल्स अतिशय स्मार्ट आहेत, पण त्यांच्याकडे एक मोठी उणीव आहे. ‘लाँग-टर्म मेमरी’ची. म्हणजेच, ही मॉडेल्स जुन्या संभाषणातील किंवा माहितीतील गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकत नाहीत.

Supermemory ही नेमकी हीच कमतरता मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. ही टेक्नॉलॉजी AI ला ‘स्मरणशक्ती’ची ताकद देते, ज्यामुळे AI जुनी माहिती, डेटा किंवा युजरच्या पसंतींवर आधारित अधिक अचूक आणि मानवी स्वरूपातील उत्तरं देऊ शकतो. जर हे तंत्रज्ञान यशस्वी झालं, तर भविष्यात AI फक्त स्मार्ट नसेल, तर ‘आठवण ठेवणारा’ आणि ‘विचार करणारा’ डिजिटल मेंदू बनेल. यामुळे AI इंडस्ट्रीत एक नवा युगप्रवेश होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुंबई ते सिलिकॉन व्हॅलीचा प्रवास

ध्रव्य शाहचा प्रवास मुंबईच्या गल्लीपासून थेट सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचला आहे. जिथे बाकी विद्यार्थी IIT च्या तयारीत गुंतले होते, तिथे ध्रव्यने कोडिंगला आपलं शस्त्र बनवलं. त्याने तयार केलेलं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे Twitter Automation Tool, जे नंतर ‘Hypefury’ नावाच्या कंपनीला विकलं गेलं. यानंतर तो अमेरिकेत गेला आणि स्वतःला एक चॅलेंज दिले. 40 आठवड्यांत, दर आठवड्याला एक नवीन प्रोजेक्ट तयार करायचं! याच काळात त्याने बनवलेला एक छोटा प्रोजेक्ट ‘AnyContext’ नंतर विकसित होऊन आजचं Supermemory बनलं.

कोडिंगची ध्रव्यची दुनिया

ध्रव्यने करिअरची सुरुवात Hypefury मध्ये Full Stack Developer म्हणून केली. यानंतर तो ‘Mem0 (YC S24)’ मध्ये AI Engineer झाला आणि नंतर Cloudflare या जागतिक तंत्रज्ञान कंपनीत Developer Relations Lead या पदावर पोहोचला. याच अनुभवातून त्याला AI इंफ्रास्ट्रक्चर आणि डेटा सिस्टिम्सची खोल समज मिळाली, आणि याच प्रेरणेने Supermemory ची पायाभरणी झाली.

ध्रव्य सांगतो, “AI ला खरं स्मार्ट बनवायचं असेल, तर त्याला मानवी मेंदूप्रमाणे ‘आठवण ठेवण्याची’ आणि ‘समजून घेण्याची’ क्षमता द्यावी लागेल. Supermemory हा त्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे.” ध्रव्यचं स्वप्न आहे की पुढील काही वर्षांत Supermemory केवळ AI टूल नसेल, तर प्रत्येक ॲप आणि व्यवसायाचा अविभाज्य भाग बनेल.

नव्या पिढीचा नवा प्रेरणास्त्रोत

फक्त 19 व्या वर्षी सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांना प्रभावित करणं म्हणजे ध्रव्य शाहचं यश हे भारतीय तरुणाईसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्याचं हे यश दाखवून देतं की, वय नव्हे, तर कल्पकता आणि चिकाटी हेच खरे यशाचं गमक आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment