Sky Stadium : सौदी अरेबिया पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेत आहे. “NEOM Sky Stadium” नावाचं जगातील पहिलं ‘आकाशातील स्टेडियम’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना समोर आली आहे. ही केवळ एक क्रीडांगणाची संकल्पना नसून, ती मानवाच्या अभियांत्रिकी कल्पकतेचं आणि भविष्यदर्शी दृष्टिकोनाचं प्रतीक मानली जात आहे.
या अत्याधुनिक स्टेडियममध्ये सुमारे 46000 प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असेल. सर्वात खास बाब म्हणजे, हे स्टेडियम पूर्णपणे सौर आणि वाऱ्याच्या उर्जेवर चालणार आहे, म्हणजेच हे 100 % ‘ग्रीन एनर्जी’वर आधारित प्रकल्प असेल.
📢🇸🇦 𝘽𝙍𝙀𝘼𝙆𝙄𝙉𝙂: Saudi Arabia’s NEOM 🇸🇦
— Artology (@ArtologyOffice) October 19, 2025
🏟️ **World’s First “Sky Stadium” – NEOM Stadium** ☁️
🪶 Suspended **350 meters (1,150 ft)** above ground!
👥 **46,000 seats** with breathtaking views
⚡ 100% **Renewable Energy powered** 🌞💨
🗓️ Opening: **2032**
⚽ Will… pic.twitter.com/fqaqZW90d2
NEOM आणि ‘The Line’ प्रकल्पाचा भाग
हे भव्य स्टेडियम NEOM च्या “The Line” स्मार्ट सिटीमध्ये उभारले जाणार आहे. NEOM हा सौदी अरेबियाचा 500 अब्ज डॉलर्सचा भविष्यदर्शी उपक्रम आहे, ज्यामध्ये शाश्वत विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर भर दिला जातो.
2027 मध्ये बांधकाम सुरू होण्याची आणि 2032 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे वेळापत्रक सौदी अरेबियाच्या 2034 FIFA World Cup योजनेशी सुसंगत ठेवण्यात आले आहे.
1100 फुट उंच आकाशातील स्टेडियम!
या स्टेडियमचं सर्वात चर्चेचं वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीपासून तब्बल 1100 फुट उंच असेल. म्हणजेच हे स्टेडियम प्रत्यक्षात आकाशात ‘लटकणार’ आहे! अशी कल्पना पूर्वी केवळ विज्ञानकथांमध्ये दिसायची, पण आता ती वास्तवात येणार आहे.
तांत्रिक आव्हानं आणि जागतिक उत्सुकता
या प्रकल्पाकडे जगभरातील अभियांत्रिकी तज्ञ आणि उद्योगपतींनी उत्सुकतेने पाहायला सुरुवात केली आहे. मात्र, इतक्या उंचीवर स्टेडियम बांधणं हे मोठं तांत्रिक आणि लॉजिस्टिक आव्हान असल्याचं निरीक्षकांचं मत आहे. प्रकल्पाच्या वेळापत्रकाबाबतही शंका उपस्थित होत आहेत, पण सौदी सरकार आणि NEOM व्यवस्थापन आत्मविश्वासाने पुढे जात आहे.
Vision 2030 अंतर्गत नवा अध्याय
सौदी अरेबियाच्या Vision 2030 योजनेअंतर्गत देश पर्यटन, खेळ, आणि मनोरंजन उद्योगात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. NEOM Sky Stadium हा त्याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा मानला जातो. या प्रकल्पामुळे सौदी अरेबिया जगातील तंत्रज्ञान आणि वास्तुकलेच्या नकाशावर एक वेगळं स्थान निर्माण करणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा