Video : मुलीच्या लग्नात खिशाला QR कोडचा स्टीकर लावून ‘आहेर’ घेणारा बाप व्हायरल!

WhatsApp Group

Kerala Viral Paytm QR Code Wedding : भारतीय लग्नांमध्ये परंपरा, रीतिरिवाज आणि भव्यता यांचा दबदबा असतो. मात्र केरळमधील एका लग्नाने तंत्रज्ञान आणि परंपरेची अनोखी सांगड घालत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वधूच्या वडिलांनी आपल्या शर्टच्या खिशावर Paytm QR कोड लावून पाहुण्यांना “शगुन” डिजिटल पद्धतीने देण्याचे आमंत्रण दिले आणि काही क्षणात ते इंटरनेटवर सुपरहिट ठरले!

ऑनलाइन व्हायरल झालेल्या छोट्या व्हिडिओमध्ये आनंद, हशा आणि रंगांनी भरलेले लग्नाचे वातावरण दिसते. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधून घेतो तो वधूच्या वडिलांचा अभिनव विचार. पारंपरिक लिफाफ्यांऐवजी पाहुणे QR स्कॅन करून थेट मोबाइलमधून पैसे पाठवत होते. पर्यावरणपूरक आणि पूर्ण डिजिटल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड ठेवणारा हा उपक्रम अनेकांच्या पसंतीस उतरला.

हेही वाचा – ‘Apple Watch’ नसती तर मी आज जिवंत नसतो! मध्य प्रदेशातील तरुणाचा थरारक अनुभव

या व्हिडिओला “Cashless Marriage” असे नाव देण्यात आले असून हजारो कमेंट्स आणि रिआक्शन मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले, “खरंच स्मार्ट आयडिया! ना लिफाफ्याचा खर्च, ना पैशांची गडबड!” दुसऱ्याने मजेशीर लिहिले – “टेक्नोलॉजिया!”

तथापि काही लोकांनी पारंपरिक पद्धतीला पाठिंबा देत टीका केली. “कॅश मिळाली असती तर टॅक्स लागला नसता!” असे एकाने लिहिले. तर दुसऱ्याने थट्टेत म्हटले, “असं असेल तर जेवणही Zomato-Swiggy वरून ऑर्डर करून घरीच खाऊ!”

ही पहिली वेळ नाही. केरळमध्ये यापूर्वीही तंत्रज्ञानाचा वापर करत लग्न समारंभ चर्चेत आले आहेत. कावासेरी गावातील नवरा–नवरी लावण्या आणि विष्णू यांनी व्हिडिओ KYCद्वारे पंचायत कार्यालयातून डिजिटल मॅरेज सर्टिफिकेट घेतले होते. फोटोसह मिळालेले डिजिटल प्रमाणपत्रही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

स्पष्ट आहे भारतीय लग्नं आता फक्त परंपरेपेक्षा टेक-सेव्ही होत आहेत… आणि तंत्रज्ञान आता पाहुण्यांमध्ये प्रमुख मानकरी बनू लागले आहे!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment