लालबागचा राजा फेमस आहेच, पण ‘या’ गणपती मंडळांची शोभा काही औरच!

WhatsApp Group

Ganesh Utsav 2025 : संपूर्ण भारतभरात गणेशोत्सव हा अतिशय श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जातो. गणपती बाप्पांचे आगमन 10 दिवसांच्या सोहळ्यासह घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये केलं जातं. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी आहे, आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. सकाळ-संध्याकाळच्या आरत्या, बाप्पांसाठी नैवेद्य, भक्तिगीतं, आणि जयघोषाने वातावरण भक्तिमय होतं.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाचं एक विशेष स्थान आहे. ‘लालबागचा राजा’ हे या उत्सवाचं प्रतीक मानलं जातं. बॉलीवूडपासून सामान्य माणसांपर्यंत लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहतात. मात्र, गणेशोत्सवाचा जल्लोष केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. भारतात अशा अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची भव्यता अनुभवायला मिळते.

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती   

पुणे शहरात गणेशोत्सवाचा खास इतिहास आहे. दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याचे सर्वात प्रसिद्ध गणपती आहेत. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सार्वजनिक मंडळांची सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तीमय वातावरण आणि सामाजिक उपक्रम यामुळे पुण्याचा गणेशोत्सव अधिक खास ठरतो. पुणेकरांचा उत्साहही वाखाणण्याजोगा असतो.

हेही वाचा – ₹50 चा ‘फसवा’ कॅशबॅक रॅपिडोला पडला 10 लाखाचा!

हैदराबाद : खैरताबादचा भव्य गणपती

दक्षिण भारतातील हैदराबाद येथेही गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो. खैरताबाद येथे दरवर्षी बनवण्यात येणारी विशाल गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरते. विविध थीम्सवर आधारित मूर्ती, आणि बालापुर भागातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणूक यामध्ये हजारो लोक सहभागी होतात. हैदराबादमध्येही वातावरण भक्तिभावाने न्हालेलं असतं.

गोवा : ‘चावोथ’चा पारंपरिक सोहळा

गोव्यात गणेशोत्सवाला ‘चावोथ’ असं स्थानिक नाव आहे. येथे गणपतीचे आगमन घराघरात केलं जातं आणि पाच दिवसांनी पारंपरिक रीतिरिवाजांसह विसर्जन केलं जातं. गोव्यातील लोक पारंपरिक वस्त्र परिधान करून पूजा करतात. विशेषत: स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रितीमुळे गोव्याचा गणेशोत्सव वेगळा आणि लक्षवेधी ठरतो.

दिल्ली : राजधानीतही बाप्पाची धूम

दिल्लीसारख्या महानगरातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक भागांमध्ये भव्य मंडप उभारले जातात. आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सामाजिक सेवा यांचा एकत्रित अनुभव येथे मिळतो. यमुना नदीच्या किनाऱ्यावर बाप्पाचं विसर्जन केलं जातं. दिल्लीतील गणेश मंडळे महाराष्ट्रातील परंपरांना जपत ही परंपरा पुढे नेत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment