₹50 चा ‘फसवा’ कॅशबॅक रॅपिडोला पडला 10 लाखाचा!  

WhatsApp Group

Rapido Penalty : शहरी भागांमध्ये कमी अंतराच्या प्रवासासाठी लोकप्रिय असलेली बाइक-टॅक्सी सेवा Rapido आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. कारण, फसवी जाहिराती केल्याप्रकरणी The Central Consumer Protection Authority (CCPA) ने रॅपिडोवर ₹10 लाखांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर ग्राहकांना दिलेला ₹50 चा कॅशबॅक फसवा ठरल्याने सर्व यूजर्सना रिफंड देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

“५ मिनिटांत ऑटो” आणि “₹५० कॅशबॅक” – पण प्रत्यक्षात काय मिळालं?

रॅपिडोने आपल्या जाहिरातींमध्ये दावा केला होता की,

  • 5 मिनिटांत ऑटो मिळेल
  • ₹50 कॅशबॅक मिळेल
  • राइड सहज उपलब्ध होईल

परंतु अनेक ग्राहकांनी तक्रार केली की हे सर्व दावे फसवे होते. ना ऑटो वेळेत मिळालं, ना ₹50 नकद परत आले. जे काही दिलं गेलं, ते होतं Rapido Coins, जे फक्त पुढील राइडसाठी वापरता येत होते आणि ते ही केवळ 7 दिवसांतच एक्सपायर होत होते.

हेही वाचा – गुरुजीच निघाले ‘फसवे’! 22 शिक्षकांची उचलबांगडी, आता पगारही परत द्यायचा आणि जेलही ठरलेली!

जून 2024 पासून तक्रारींचा पाऊस

गेल्या काही महिन्यांत, विशेषतः जून 2024 पासून, रॅपिडोविरोधात शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत.

  • अनेक प्रकरणांमध्ये अजूनही तोडगा निघालेला नाही
  • वेळेवर राइड मिळाली नाही
  • ड्रायव्हर्सचा वाईट वर्तन
  • कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक

यामुळेच CCPA ने या कंपनीवर कारवाई करत ₹10 लाखाचा दंड लावला.

ग्राहकांना फसवणूक करणे महागात पडले

सर्वात मोठी फसवणूक म्हणजे ₹50 कॅशबॅकचा दावा. रॅपिडोने जाहिरातीत ‘नकद’ कॅशबॅक देतो असे म्हटले, पण प्रत्यक्षात फक्त नॉन-रिडीमेबल कॉइन्स मिळाले. यामुळे CCPA ने रॅपिडोला खालील कडक आदेश दिले आहेत:

  • सर्व ग्राहकांना खऱ्या ₹50 चा रिफंड द्यावा
  • भ्रामक जाहिराती तात्काळ बंद कराव्यात
  • 15 दिवसांत अनुपालन रिपोर्ट सादर करावा

ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा

ही घटना ग्राहकांसाठी एक मोठा धडा आहे. कोणतीही जाहिरात पाहून लगेच विश्वास ठेवू नये. याशिवाय, कंपन्यांनी देखील यापुढे अर्धवट वायदे करून ग्राहकांना गंडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment