UP Fake Degree Teachers News : उत्तर प्रदेशातील शिक्षण विभागाने एक मोठे आणि धडकी भरवणारे पाऊल उचलले आहे. बनावट मार्कशीट आणि फेक डिग्रीच्या आधारे नोकरी मिळवलेल्या 22 शिक्षकांची सेवा तात्काळ संपवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, या शिक्षकांनी आजवर घेतलेला सर्व पगारही परत घेतला जाणार असून, त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेशही जारी झाले आहेत.
ही कारवाई सपा सरकारच्या काळात म्हणजे 2014 मध्ये निघालेल्या शिक्षक भरती जाहिरातीशी संबंधित आहे. 2016 मध्ये सहायक शिक्षकांच्या पदांवर भरती झाली होती. बहुतेक शिक्षक आजमगड विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते – त्यात बलिया, मऊ, लखनऊ, बाराबंकी, सहारनपूर, कानपूर देहात, मिर्झापूर आणि बुलंदशहर यांचा समावेश आहे.
#UttarPradesh के विभिन्न जिलों में तैनात फर्जी सहायक अध्यापक किये गए बर्खास्त, फर्जी दस्तावेजों के आधार पर हासिल की थी नियुक्ति, फर्जी अध्यापको से वेतन रिकवरी के साथ उनके खिलाफ FIR के आदेश जारी…@myogiadityanath @UPGovt @News18UP @News18India#teacher #school #curruption pic.twitter.com/5yaLp4iKgu
— Rajeev Pratap Singh (@ranarajeevsingh) August 20, 2025
बनावट डिग्रीचा पर्दाफाश
अलीकडेच, शिक्षण विभागाने या भरती प्रक्रियेतील दस्तऐवजांची बारकाईने छाननी सुरू केली. त्यावेळी अनेक शिक्षकांची सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट्स बनावट असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण विभागाने यावर तात्काळ कारवाई करत या सर्व 22 शिक्षकांची सेवा संपवून टाकली. एवढ्यावरच न थांबता, एक अधिकृत प्रेस रिलीज जाहीर करून संपूर्ण यादीही सार्वजनिक करण्यात आली आहे.
हेही वाचा – हा तरुण म्हणतो, “ही जमीन कुणाचीच नाही, आता माझी आहे!” आणि झाला राष्ट्राध्यक्ष
काय निर्णय झाले?
- सेवा तात्काळ संपुष्टात आणली
- आजवर मिळालेला पगार परत घेतला जाणार
- FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना
शैक्षणिक घोटाळ्याला चाप
यामुळे शिक्षण खात्याचा स्पष्ट संदेश आहे, “बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांना यापुढे कोणतीही सूट नाही. आता कोणताही बनावट शिक्षक शिक्षण व्यवस्थेत टिकणार नाही.”
या घटनेमुळे पालकवर्ग आणि समाजामध्ये चिंता वाढली आहे की, आपल्या मुलांचे भवितव्य बनावट गुरुजींच्या हाती होते! पण अशा शिक्षकांवर कारवाई करून शिक्षण खात्याने एक सकारात्मक संदेश दिला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा