

पंपावर पेट्रोल-डिझेल भरताना लोक झिरो बघतात. पण हा झिरो बघितला म्हणजे चोरी होत नाही असे नाही. पेट्रोल पंपावर झिरोव्यतिरिक्त दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिले. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते आणि पैसेही वाया जाऊ शकतात. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने पेट्रोल आणि डिझेल भरण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबाबत ट्वीट केले आहे. (Fuel Filling Tips)
यात असे म्हटले आहे,
“ग्राहकांनो लक्ष द्या! पेट्रोल आणि डिझेल भरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा –
- मीटर रीडिंग 0.00 असावे.
- डिस्पेंसिंग मशीनचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट दाखवण्यात यावे.
- ग्राहकांची इच्छा असल्यास, ते पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या 5 लिटर स्केलचा वापर करून टाकलेल्या इंधनाची मात्रा तपासू शकतात.”
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार, प्रत्येक पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर असणे आवश्यक आहे आणि आवश्यकतेनुसार तो ग्राहकांना दिला करणे आवश्यक आहे. पेट्रोलमध्ये भेसळ आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाका, त्यावर डाग पडले तर पेट्रोल भेसळ आहे आणि नसेल तर ते शुद्ध आहे.
हेही वाचा – आधी रश्मिका, आता काजोल! या ‘डीपफेक’पासून स्वत:ला कसं वाचवाल?
ग्राहक कुठे तक्रार करू शकतात?
ग्राहक व्यवहार विभागाने आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काही शंका असल्यास, ग्राहक लीगल मेट्रोलॉजी अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवू शकतात.
घनता तपासा
पेट्रोलच्या घनतेमध्ये तफावत आढळल्यास तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याची घनता तपासा. घनता ही पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!