कोपर मारलं, चिमटा काढला….; नितीन गडकरींसमोर दोन महिला अधिकारी भिडल्या; हा VIDEO पाहिलात का?

WhatsApp Group

Nagpur Female Officers Fight Viral Video : म्हणतात ना, “ऑफिसमधलं टेन्शन कधी कधी स्टेजवरही येतं!” अगदी तसंच काहीसं दृश्य नागपुरातल्या एका सरकारी रोजगार मेळाव्यात घडलं. आणि गंमत म्हणजे, हे सगळं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच! घडलेली गोष्ट बघून उपस्थित सगळ्यांचे डोळे चकित झाले आणि मोबाईल कॅमेऱ्यांचे ‘रेकॉर्ड’ बटण सुरू झाले. दोन महिला उच्चाधिकारी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाले आणि सुचिता जोशी यांच्यात स्टेजवरच “कोपर मार, चिमटा काढ” असा ‘लाईव्ह कॉम्बॅट’ सुरू झाला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वाद का झाला?

सगळं प्रकरण एका खुर्ची किंवा साडीचं नाही… तर पदाचं आहे! शोभा मधाले (नारंगी साडी) या नागपूरच्या पोस्टमास्टर जनरल होत्या. पण 8 सप्टेंबर रोजी त्यांचा बदली आदेश कर्नाटकच्या घरवाड येथे लागला. दरम्यान, नवीन नियुक्ती होईपर्यंत नागपूरचा चार्ज नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी (ग्रे साडी) यांना देण्यात आला.

पण काय झालं? मधालेयांनी कोर्टात धाव घेतली आणि बदली आदेशावर स्टे मिळवला! आता दोघींकडे एकाच पदाचा ‘चार्ज’ असल्याने वातावरण तापलं, आणि त्याचाच ‘एक्सप्रेस’ सीन रोजगार मेळाव्यात दिसला.

स्टेजवरच भांडण

रोजगार मेळाव्यात दोघी एकाच सोफ्यावर बसल्या होत्या. पुढचं दृश्य पाहणाऱ्यांनी कल्पनाही केली नव्हती.
मधाले यांनी जोशी यांच्या हाताला कोपर मारले, त्यातून पाण्याचा ग्लास सांडला. एवढंच नाही, आरोप असा की मधाले यांनी जोशींच्या हाताला चिमटाही काढला!

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेलं हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहून सगळेच थक्क झाले. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि लोकांनी मीम्स, जोक्स आणि रील्स बनवायला सुरुवात केली.

पुढे काय होणार?

या दोन्ही महिला अधिकाऱ्यांविरोधात आता अनुशासनात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. पण नागपूरकरांच्या दृष्टीने हा दिवस ‘रोजगार मेळावा’पेक्षा ‘मनोरंजन मेळावा’च ठरला!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment