

Best Catch in Cricket History : क्रिकेटमध्ये आता अचंबित करणारे कॅचेस घेतले जातात. या कॅचेस त्या त्या दिवशी सोशल मीडियापासून सगळीकडे चर्चा रंगवतात. पण तुम्हाला जगातील सर्वोत्तम कॅच माहितीये का किंवा तो बघितलाय का? गूगलवर सर्च केल्यास तुम्हाला इंग्लंडच्या वायटॅलिटी ब्लास्टमधील एक व्हिडिओ सापडेल. हा क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम कॅच असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावरही या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वायटॅलिटी ब्लास्टमधील सामन्यादरम्यान एका खेळाडूने असा झेल घेतला, ज्यानंतर फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले. कोणालाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा कॅच ब्रॅड करीने (Brad Currie) टिपला होता.
या स्पर्धेच्या यंदाच्या म्हणजे 2023 च्या हंगामात ससेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात सामना झाला. हॅम्पशायरच्या डावाच्या 19व्या षटकाच्या बेनी हॉवेलने ससेक्सचा बॉलर टायमल मिल्सला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा फटका षटकारच होता, पण ससेक्सचा खेळाडू ब्रॅड करीने हवेत तरंगत एका हाताने हा बॉल टिपला. विजयासाठी 183 धावांचा पाठलाग करणाऱ्या हॅम्पशायरला एका टप्प्यावर 11 चेंडूत 23 धावांची गरज होती. 14 चेंडूंत 25 धावा केल्यानंतर बेनी हॉवेल धोकादायक दिसत होता. पण ब्रॅड करीच्या अद्भूत कॅचमुळे त्यावा पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ब्रॅडने याच सामन्यातून आपल्या टी-20 कारकिर्दीला सुरुवात केली.
सोशल मीडियावरही लोकांनी याला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅच असल्याचे म्हटले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!