EPFO PF Withdrawal : कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ने आपल्या सदस्यांसाठी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता सदस्यांना त्यांच्या PF खात्यातील 100% रक्कम — म्हणजेच कर्मचारी आणि नियोक्त्याचा हिस्सा दोन्ही — पूर्णपणे काढता येणार आहे. ही घोषणा नवी दिल्ली येथे झालेल्या EPFO च्या 238व्या केंद्रीय न्यास मंडळ (CBT) बैठकीत करण्यात आली. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आपल्या मेहनतीच्या पैशांवर अधिक नियंत्रण मिळणार आहे.
आतापर्यंत काय नियम होते?
यापूर्वी, PF खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी फक्त सेवानिवृत्ती किंवा बेरोजगारीच्या परिस्थितीतच मिळत होती.
- नोकरी गेल्यानंतर एका महिन्याने 75% रक्कम आणि
- दोन महिन्यांनंतर उरलेली 25% रक्कम काढता येत होती.
सेवानिवृत्तीच्या वेळी मात्र कोणतेही निर्बंध नव्हते.
तर आंशिक पैसे काढण्यासाठी फक्त 90% पर्यंत रक्कम घर खरेदी, बांधकाम किंवा कर्जफेडीसाठी वापरता येत होती.
आता पूर्ण PF रक्कम काढता येणार!
EPFO च्या नव्या निर्णयानुसार, सदस्यांना त्यांची संपूर्ण पात्र PF रक्कम आवश्यकतेनुसार काढता येणार आहे. मात्र, यासाठी काही अद्ययावत नियम लागू असतील.
हेही वाचा – 738 दिवसांच्या कैदेनंतर प्रेमी झाले पुन्हा एकत्र; गळाभेट आणि किसचा व्हिडिओ जगभर व्हायरल!
आंशिक पैसे काढण्याचे नियम सोपे केले
पूर्वी 13 वेगवेगळे नियम होते, ज्यामुळे प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत होती. आता हे सर्व एकत्र करून फक्त 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत –
आवश्यक गरजा (जसे शिक्षण, आजारपण, लग्न)
गृहसंबंधित गरजा
विशेष परिस्थिती
आता शिक्षणासाठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा पैसे काढता येतील. यापूर्वी दोन्ही मिळून केवळ 3 वेळा परवानगी होती. तसेच, किमान 12 महिन्यांची सेवा पूर्ण असली की कोणत्याही प्रकारचा आंशिक विड्रॉल करता येईल.
विशेष प्रकरणांसाठी कारण देण्याची गरज नाही
पूर्वी नैसर्गिक आपत्ती, बेरोजगारी, कारखाना बंद होणे अशा कारणांची माहिती देणे आवश्यक होते. पण आता ‘विशेष परिस्थिती’ अंतर्गत पैसे काढताना कारण सांगणे आवश्यक नाही. त्यामुळे हजारो अर्ज नाकारले जाण्याचे प्रमाण कमी होईल.
किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक
EPFO ने एक महत्त्वाचा नियम जोडला आहे, किमान 25% रक्कम खात्यात ठेवावी लागेल. ही रक्कम 8.25% वार्षिक व्याजाने वाढत राहील. त्यामुळे भविष्यातील निवृत्ती निधी सुरक्षित राहील आणि एकाच वेळी आर्थिक लवचिकताही मिळेल.
Zero Paperwork – डिजिटल प्रक्रिया सुरू!
EPFO ने जाहीर केले आहे की आता आंशिक विड्रॉलसाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात आणि ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट पद्धतीने होईल.
यामुळे वेळ वाचेल आणि सदस्यांना त्वरित रक्कम मिळेल.
पेन्शन विड्रॉलचे नियमही बदलले
पूर्वी पेन्शनची अंतिम सेटलमेंट दोन महिन्यांनंतर करता येत होती. आता ती मुदत 36 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, प्रीमॅच्युअर सेटलमेंटसाठीची मुदत 2 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली आहे. यामुळे सदस्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळेल.
‘विश्वास योजना’ आणि ‘EPFO 3.0’ चा शुभारंभ
EPFO च्या या बैठकीत ‘Vishwas Scheme’ सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या कमी होईल. तसेच, Doorstep Digital Life Certificate सेवा आणि EPFO 3.0 मॉडर्नायझेशन प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा