55 व्या वर्षी निवृत्तीचं स्वप्न! पण FD मध्ये ठेवलेले ‘80 लाख’ खरंच पुरतील का?

WhatsApp Group

FD Retirement Planning : 55 वर्षांचे झाल्यावर निवांत आयुष्य, प्रवास, कुटुंबाला वेळ… अशी निवृत्तीची स्वप्ने अनेक भारतीय पाहतात. पण महागाईचा चटका आणि खर्चाचा वेग पाहता ही स्वप्ने पूर्ण होणार की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहतो.

आज 50 वर्षांचा असलेला गुंतवणूकदार, ज्याच्याकडे FD मध्ये 80 लाख रुपये आहेत आणि महिन्याचा सध्याचा खर्च 60,000 आहे, तो 5 वर्षांत निवृत्त होऊ शकतो का? तज्ञ सांगतात, ‘महागाई आणि कमी FD रिटर्न हे तुमच्या स्वप्नांचे मोठे शत्रू आहेत.’

महागाईचा घात : आजचा 60,000 खर्च 5 वर्षांत 80,000 होणार!

महागाई 6% असल्याने आजचा 60,000 हा खर्च 55 व्या वर्षी किमान 80,000 रुपये होईल. स्क्रिपबॉक्सचे मॅनेजिंग पार्टनर सचिन जैन सांगतात, “निवृत्तीच्या पहिल्या महिन्यात आवश्यक असणारी ही बेसलाइन अमाउंट आहे.”

याचा अर्थ पुढील 20 वर्षे (वय 75 पर्यंत) हा खर्च भागवण्यासाठी 1.83 कोटींची कॉर्पस लागणार. पण FD मधून मिळणारा प्रभावी परतावा फक्त 0.47% (महागाई व कर वजा करून) राहतो. यामुळे 80 लाख फक्त 44–46% गरजा भागवतात. तज्ज्ञ संजीव गोविला सांगतात, “FD वर अवलंबून राहिल्यास कॉर्पस 70 व्या वर्षीच संपण्याचा धोका आहे.”

FD ची खरी अडचण

FD वर 6.5–7% व्याज मिळालं तरी कर कापल्यानंतर परतावा 4–4.5% राहतो. 5 वर्षांत 80 लाख सुमारे 1.13 कोटी होतील… पण गरज आहे 1.83 कोटींची, म्हणजेच 70 लाख रुपयांची तूट कायम!  

FD सोबत काय कराल?  

तज्ज्ञ सल्ला देतात की पुढील 5 वर्षे FD मध्ये बसून न राहता Balanced Portfolio तयार करा:

  • Equity Mutual Funds (Growth)
  • Debt / Bonds (Stability)
  • Hybrid Funds (Medium Risk)

या मिश्रणातून 9–11% रिटर्न मिळू शकतो, ज्यामुळे 1.83 कोटींच्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल.

हेही वाचा – IPL 2026 Auction : 350 खेळाडूंची यादी जाहीर; 2 कोटी बेस प्राईसमध्ये फक्त दोन भारतीय! KKR-CSK सर्वाधिक खेळाडू विकत घेणार का?

निवृत्तीनंतर किती पैसे काढावे? ‘Withdrawal Rule’ महत्त्वाचं!

1.83 कोटी कॉर्पस असल्यास तज्ञ सुचवतात:

दरवर्षी फक्त 3–4% withdrawal

3.5% नुसार महिन्याला फक्त 51,000 रुपये मिळतात. म्हणजेच—
थोडा खर्च कमी करा किंवा
निवृत्ती कॉर्पस अजून वाढवा.

आपत्कालीन सुरक्षा : या गोष्टी MUST

  • 3–6 महिन्यांचा Emergency Fund
  • Family Floater + Super Top-up Health Insurance
  • Critical Illness Cover
  • 50+ असताना Health खर्च 5–10 लाख सहज होतो — त्यामुळे स्वतंत्र विमा असणे अत्यावश्यक.

80 लाख FD पुरेसे नाहीत… पण योग्य प्लॅनिंगने निवृत्ती सुरक्षित!

जर तुम्ही आत्ताच विविधता आणली, SIP सुरू केली, Health Insurance घेतले आणि 3–4% withdrawal rule पाळला, तर:

  • 55 व्या वर्षी निवृत्ती शक्य
  • Corpus 75 नंतरही टिकेल
  • आर्थिक ताण न घेता निवांत आयुष्य

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment