Navi Mumbai Airport : 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) चं भव्य उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि नवी मुंबई महानगर परिवहन सेवा (NMMT) यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळाशी थेट जोडणाऱ्या बससेवेची घोषणा करण्यात आली आहे.
थेट विमानतळ बस सेवा – प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय
NMIA पर्यंत थेट पोहोचणारी बससेवा लवकरच सुरू होणार असून, NMMT ने यासाठी 150 नवीन CNG बस खरेदीसाठी निविदा जाहीर केली आहे. या सेवेमुळे नागरिकांना रेल्वे स्थानकांपासून विमानतळापर्यंत थेट, स्वस्त व पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
रेल्वे स्थानकांपासून थेट कनेक्शन
नवी मुंबई विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ असल्याने, NMMT ने हार्बर रेल्वे व इतर स्थानकांपासून NMIA पर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Good news 🔥
— Jassi (@desh_bhakt123) October 7, 2025
Big step for Navi Mumbai
Eco-friendly CNG shuttle buses to connect the city with the new airport .. greener, cleaner, and more convenient travel ahead.. pic.twitter.com/3sHZMBqQFh
हेही वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोणत्या फ्लाइट्स उड्डाण घेणार? संपूर्ण माहिती वाचा…
पहिल्या टप्प्यात 20 बस सेवा तत्काळ सुरू
NMMT च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रथम टप्प्यात 20 बस तात्काळ सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांसाठी सेवा कार्यान्वित होईल.
पनवेलच्या हद्दीत असला तरी जबाबदारी NMMC ची
NMIA भलेही पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, मात्र ती नवी मुंबईच्या सीमेलगत असल्याने NMMT ने नवी मुंबईकरांसाठी सेवा सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बससेवेमध्ये लक्षणीय वाढ
सध्या NMMT कडे सुमारे 350 बस आहेत. त्यात नव्याने 150 CNG बसांचा समावेश झाल्यास, बससेवेमध्ये मोठी वाढ होईल. यामुळे भविष्यात वाढणारी प्रवाशांची संख्या सहज हाताळता येईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा