

IPL 2024 MI vs RCB : वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या एकतर्फी सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 7 गड्यांनी मात दिली. एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात आरसीबीने 197 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 40 चेंडूत 61 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावा केल्या. यानंतर अखेरीस दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 21 धावांत सर्वाधिक 5 बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. बंगळुरूने 20 षटकात 8 बाद 196 धावा केल्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी 101 धावांची भागीदारी केली. इशानने 7 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावा केल्या. तर रोहितने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 19 चेडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची झंझावाती खेळी केली. हार्दिकने 6 चेंडूत नाबाद 21 धावा करत मुंबईला 15.3 षटकातच विजय मिळवून दिला.
हेही वाचा – IPL 2024 : पाच विकेट घेतल्यानंतर बुमराहची रोहितला मिठी, मग हिटमॅननं काय केलं पाहा!
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा