

आपणही आयपीएलसारखं क्रिकेट खेळावं, असं प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळणाऱ्याला वाटतं. पण टेनिस क्रिकेटमध्ये आपण उच्च दर्जाचे स्टेडियम, भारीवाली लाइफस्टाइल, स्टँडर्ड ग्लॅमर फार कमी ठिकाणी पाहतो. पण आता ही पोकळी भरून निघाली आहे. गल्लीपासून दिल्लीत टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खऱ्या खेळाडूंसाठी एक जबरदस्त स्पर्धा (Tennis Ball Cricket League ISPL In Marathi) भरवली आहे. या स्पर्धेचे प्रारुप एकदम आयपीएलसारखेच असेल. अभिनेता अक्षय कुमारने या स्पर्धेतील एक टीमही विकत घेतली आहे.
आयपीएल 2024 पूर्वी ही टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळवली जाईल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) असे स्पर्धेचे नाव आहे. मुंबईत 2 ते 9 मार्च 2023 या कालावधीत सहा संघांची टेनिस बॉल क्रिकेट लीग T-10 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यामध्ये सर्व 19 सामने क्रिकेट स्टेडियममध्ये होतील.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) मध्ये मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर येथील फ्रेंचायझी आधारित संघ असतील, प्रत्येक संघात 16 खेळाडू आणि सहा सपोर्ट स्टाफ असतील ज्याची एकूण फी 10 लाख रुपये असेल, याशिवाय एक मेंटॉर देखील असेल. उदाहरणार्थ, माजी रणजी खेळाडू ज्याची फी 15 लाख रुपये असेल, प्रत्येक संघात एक सेलिब्रिटी अँकर मालक असेल.
हेही वाचा – Gemini Yearly Horoscope 2024 : मिथुन राशीच्या लोकांनी वैवाहिक जीवनाबद्दल सावधान! वाचा वार्षिक राशीभविष्य
प्रत्येक संघाकडे खर्च करण्यासाठी 1 कोटी रुपये असतील आणि प्रत्येक खेळाडूची आधारभूत किंमत 3 लाख रुपये असेल तर कमाल मर्यादा नाही. खेळाडूंचे 24 फेब्रुवारीला ऑक्शन होईल. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार रवी शास्त्री हे लीग कमिशनर असतील, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे कोअर कमिटीचे सदस्य असतील.
अशी होईल तुमची निवड!
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडू www.ispl-t10.com वर 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात. जवळपास साडेअकराशे रुपये देऊन नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला सिटी ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी गोल्डन तिकीट मिळेल. अंतिम चाचणी मुंबईत होणार आहे. ISPL निवड समितीचे प्रमुख जतीन परांजपे आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे 350 खेळाडूंची निवड करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये फ्रेंचायझी मालक लिलावाद्वारे 96 खेळाडूंची निवड करतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!