Ben Austin Death : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील उपनगरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने स्थानिक क्रिकेटविश्व हादरून गेले आहे. केवळ 17 वर्षांचा तरुण क्रिकेटर बेन ऑस्टिन याचा सरावादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला. मंगळवारी फर्नट्री गली येथे नेट्सच्या सरावावेळी ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेन नेट्समध्ये फलंदाजी करत असताना वेगवान चेंडू थेट त्याच्या डोक्यावर आदळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.
फर्नट्री गली क्रिकेट क्लबने अधिकृत निवेदन जारी करून बेनच्या निधनाची पुष्टी केली. क्लबने भावनिक शब्दांत म्हटले, “बेन आमच्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. त्याच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट समुदाय शोकात बुडाला आहे. बेनने आपल्या हसऱ्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती.”
Vale Ben Austin.
— Cricket Australia (@CricketAus) October 30, 2025
Cricket Australia is devastated at the passing of 17-year-old Melbourne cricketer Ben Austin following an accident while batting in the nets on Tuesday night. pic.twitter.com/zBifuqrrRG
रिंगवूड अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मायकेल फिन यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी मैदानावर उपस्थित असलेल्या लोकांनी प्रथमोपचार केले, त्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बेनच्या वडिलांचे जेस ऑस्टिन यांचे भावना व्यक्त करणारे निवेदन जाहीर केले. निवेदनात म्हटले आहे, “हा आमच्यासाठी असह्य क्षण आहे. मात्र एकच समाधान – बेन त्याच्या आयुष्यातील आवडते काम करत होता… मित्रांसोबत नेट्समध्ये क्रिकेट खेळत होता. क्रिकेट त्याच्या जीवनाचा आनंद होता.”
हेही वाचा – Gold Price Drop India : सोन्याचे दर कोसळले! एक तोळ्याच्या भावात ₹4,100 ची घसरण; चांदीही पडली!
बेनच्या वडिलांनी त्या साथीदारालाही आधार व्यक्त केला जो त्या क्षणी गोलंदाजी करत होता. “हा अपघात दोन तरुणांच्या जीवनाला धक्का म्हणून आला आहे. आम्ही त्या मुलासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत.”
या घटनेमुळे 2014 मधील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस यांच्या स्मृती जाग्या झाल्या. ह्यूजेस यांचा सिडनीमध्ये सामन्यादरम्यान डोक्यावर चेंडू लागल्याने दोन दिवसांनी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सर्वोच्च स्तरावर हेल्मेट सुरक्षेबाबत नवे नियम लागू करण्यात आले होते.
तरुण खेळाडू बेनच्या जाण्याने क्रिकेटजगत शोकसागरात बुडाले असून, युवा खेळाडूंच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा