डिस्ने वर्ल्डमध्ये सलग तिसरा मृत्यू! “जगातील सर्वात आनंदी ठिकाणी” घडतंय असं काय जे कोणी सांगतच नाही?

WhatsApp Group

Disney World Death : फ्लोरिडामधील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट पुन्हा एकदा हादरलं आहे. कारण, डिस्नेच्या कॉन्टेम्पररी रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका पाहुण्याचा मृतदेह आढळला आहे आणि हा या महिन्यातील तिसरा मृत्यू आहे. मृत व्यक्तीची ओळख 28 वर्षीय मॅथ्यू कोहन अशी पटली असून, तपास अधिकाऱ्यांनी ही घटना आत्महत्येची असल्याचं स्पष्ट केलं आहे. 1971 मध्ये उघडल्यापासून डिस्ने वर्ल्डमधील मृतांची संख्या 68 वर पोहोचली आहे.

ऑरेंज काउंटी मेडिकल एक्झॅमिनर ऑफिसच्या माहितीनुसार, कोहनचा मृतदेह मागील आठवड्यात या लोकप्रिय रिसॉर्ट परिसरात सापडला. डिस्नेच्या मॅजिक किंग्डमच्या जवळ असलेल्या या हॉटेलमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारची आत्महत्या झाल्याने, पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनास्थळी एमर्जन्सी सर्व्हिसेस तात्काळ पोहोचल्या आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले. ‘बे लेक टॉवर’ परिसर काही काळासाठी बंद करण्यात आला होता. काही साक्षीदारांनी सांगितलं की, कर्मचार्‍यांनी पाहुण्यांना त्यांच्या बाल्कनीतून बाहेर पाहू नका अशी विनंती केली होती, जेणेकरून त्यांना त्रासदायक दृश्य दिसू नये.

कॉन्टेम्पररी रिसॉर्ट हे डिस्ने वर्ल्डमधील सर्वात प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे. याचं ‘A-फ्रेम’ स्ट्रक्चर आणि लॉबीमधून जाणारा मोनोरेल हे पर्यटकांचं आकर्षण असतं. पण आता या सलग घडणाऱ्या मृत्यूंनी या “जादुई जागेला” गडद छाया पसरवली आहे.

ऑनलाइन जगतातही मानसिक आरोग्य, सुरक्षितता, आणि ताणतणावाच्या वातावरणाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकजण म्हणत आहेत की, एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळी मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि मदत केंद्रं वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा – ‘किडनी फेल्युअर’मुळं सतीश शाहंचं निधन, ‘अशी’ लक्षणं तुमच्यात दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

सोशल मीडियावरही सहानुभूती, प्रश्न आणि तर्क यांच्या लाटा उसळल्या आहेत. अनेकांनी म्हटलंय की, डिस्ने वर्ल्ड म्हणजे “Earthवरील सर्वात आनंदी ठिकाण”, पण तिथेच जर एवढ्या दु:खद घटना घडत असतील तर काहीतरी गंभीर कारण असलं पाहिजे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, या घटनेत कोणताही गुन्हेगारी संशय नाही, मात्र तपास सुरू आहे. सलग झालेल्या या तीन मृत्यूंमुळे डिस्ने रिसॉर्ट व्यवस्थापनावर दबाव वाढला आहे, आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ज्यांना आत्महत्येचे विचार येत आहेत, त्यांनी कृपया तात्काळ मदत घ्यावी. भारतात हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहेत –
AASRA Helpline: 91-9820466726
Snehi: 91-9582208181
आपण एकटे नाही. मदत नेहमीच मिळू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment