राज्यपालांच्या नातवाचा रहस्यमय मृत्यू! आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं, “आत्मे मला त्रास देतात..”

WhatsApp Group

Governor Manoj Sinha Grandson Death : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचा 16 वर्षीय नातू आरव मिश्रा याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरच्या कोहना भागातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.

आरव हा अलोक आणि दिव्या मिश्रा यांचा मुलगा असून सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आरवचे आई-वडील छठपूजेसाठी भागलपूरला गेले होते, तर त्याची बहीण कॉलेजला होती. त्या वेळी तो आपल्या आजीबरोबर घरी होता.

आजीनं जेवणासाठी हाक मारली तेव्हा आरवच्या खोलीचं दार आतून बंद होतं. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आलं. आतमध्ये आरव छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना तातडीने कळवण्यात आलं.

आत्महत्येची चिठ्ठी आणि ‘आत्म्यांकडून छळ’

कोहना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय तिवारी यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत आरवने लिहिले आहे की, “मला काही आत्मे त्रास देतात. ते मला माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवायला सांगतात, नाहीतर स्वतःचा जीव घ्यायला सांगतात.”

हेही वाचा – दिल्लीतील कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला! ढगांवर उधळले कोट्यवधी, तरी एक थेंबही पडला नाही

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वीच आरवने आपल्या बहिणीला सांगितले होते की, त्याला काही अज्ञात आकृती दिसतात आणि त्या त्याला सतत भयभीत करतात. मात्र, कुटुंबाला वाटलं की हा फक्त तणावाचा परिणाम असावा, त्यामुळे त्यांनी त्याकडे गंभीरपणे पाहिलं नाही.

पोलीस तपास आणि मानसिक आरोग्याचा अँगल

घटनेनंतर पोलिसांनी आरवचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी तपासायला सुरुवात केली आहे, जेणेकरून कुठल्या बाह्य प्रभावामुळे किंवा ऑनलाईन कंटेंटमुळे त्याच्यावर परिणाम झाला का हे समजता येईल.

याशिवाय, आरवच्या मानसिक स्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं आहे.

सोमवारी भाजपचे वरिष्ठ नेते मिश्रा कुटुंबाच्या घरी भेट देऊन शोक व्यक्त केला. आरवचे वडील अलोक मिश्रा हे कानपूरमधील उद्योगपती असून राज्यपाल मनोज सिन्हा यांचे पुतणे आहेत.

या घटनेने संपूर्ण कानपूर शहरात आणि सिन्हा कुटुंबात शोककळा पसरली आहे. समाजमाध्यमांवर अनेकांनी या घटनेबद्दल संवेदना व्यक्त केल्या असून, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकतेची गरज अधोरेखित केली जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment