

IPL 2024 GT vs MI : 2013 पासून स्पर्धेतील पहिला सामना हरण्याचा सिलसिला मुंबई इंडियन्सचा यंदाही कायम आहे. मोदी स्टेडियमवर ररंगलेल्या रंगतदार सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 6 धावांनी मात दिली. यासोबत गुजरातने आपले गुणांचे खाते उघडले. मुंबईने हातात अससलेला सामना गुजरातच्या बाजूला झुकवला. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यास उतलेला गुजरात 20 षटकात 168 धावा करू शकला. प्रत्युत्तरात मुंबईकडून रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस यांनी चांगली खेळी केली. पण गुजरातने मोक्याच्या क्षणी विकेट काढल्याने सामना जिंकला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 19 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने एक षटकार आणि एक चौकार लगावत रंगत आणली, पण उमेश यादवने त्याला बाद केले.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये संघाने 47 धावा केल्या. वृद्धिमान साहाने 15 चेंडूत 19 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने 22 चेंडूत 31 धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाई 11 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. 17व्या षटकात बुमराहने दुहेरी झटका दिला. त्याने डेव्हिड मिलर (12) आणि साई सुदर्शन (45) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईकड़ून जसप्रीत बुमराहने 14 धावांत सर्वाधिक 3 बळी घेतले.
हेही वाचा – IPL 2024 : “तू बाऊंडरी लाईनवर जा….”, हार्दिक पांड्याने लावली रोहित शर्माची फिल्डिंग, पाहा Video
दोन्ही संघाची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पीयुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, लूक वूड.
गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा