

IPL 2024 MI vs RCB : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीकडून विल जॅक्स पदार्पणाचा सामना खेळत आहे.
आयपीएलमध्ये सहसा संथ सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम आतापर्यंत दुःस्वप्न ठरला आहे. नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला चारपैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे. फाफ डुप्लेसिसने राजस्थानविरुद्ध काही चुका केल्या होत्या, त्यामुळे संघाला तोटा सहन करावा लागला होता. या मोसमात संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलला त्याने त्या सामन्यात एकही षटक टाकले नाही. त्यामुळे फॅफच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले असून अनेक माजी खेळाडूंनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – सोने लवकरच होणार प्रति तोळा 1 लाख रुपये, गेल्या 7 दिवसांत वाढले ‘इतके’!
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा