Team India Schedule 2024 : यंदा लय बिझी राहणार टीम इंडिया! संपूर्ण वेळापत्रक जाहीर

WhatsApp Group

2024 वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षात टीम इंडियाचे वेळापत्रक (Team India Schedule 2024 In Marathi) खूपच व्यस्त असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षात सातत्याने क्रिकेट खेळणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकही यंदा खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला 2024 मध्ये 14 कसोटी सामने खेळायचे आहेत.

टीम इंडियाचा नवीन वर्षातील पहिला सामना

टीम इंडिया नवीन वर्षात पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला गेला आहे. या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे. यानंतर देशांतर्गत सामने खेळवले जातील. ज्यामध्ये भारताला अफगाणिस्तानविरुद्ध 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

भारतीय क्रिकेट संघ जानेवारी ते मार्च दरम्यान इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.

आयपीएल 2024

आयपीएल 2024 चे आयोजन मार्च ते मे दरम्यान केले जाईल. यावेळी टीम इंडियाचे सर्व खेळाडू यात व्यस्त असतील. प्रेक्षकांना आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणार आहे.

टी-20 विश्वचषक

टीम इंडिया जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहे. टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे आयोजित करणार आहे. मात्र, टीम इंडियाला वर्ल्डकपपर्यंत फार कमी सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा – सिंगापूर होणार धारावी! अदानींची कामाला सुरुवात, जाणून घ्या प्लॅन

विश्वचषकानंतरचे भारताचे वेळापत्रक

टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यादरम्यान टीम इंडियाला प्रत्येकी 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारताचा श्रीलंका दौरा जुलैमध्ये होणार आहे. यानंतर बांगलादेशचा संघ ऑगस्टमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळवले जातील.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने

न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असेल. या कालावधीत 3 कसोटी सामने खेळवले जातील. भारताला वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment