‘बहीण आहे माझी’ असं म्हणताच पोलीस संतापला… रेस्टॉरंटमध्ये गोंधळ; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन

WhatsApp Group

Bihar Cop Harassing Siblings Viral Video : बिहारमधील एका पोलीस अधिकाऱ्याला एका व्हायरल व्हिडिओमुळे निलंबित करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये तो एका भावाबहिणीशी रेस्टॉरंटमध्ये उग्र वाद घालताना दिसत आहे. हा प्रकार सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनालाही तत्काळ कारवाई करावी लागली.

ही घटना 24 ऑक्टोबर रोजी बरसोई (Barsoi) येथील BR-11 रेस्टॉरंटमध्ये घडली. येथे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) एका टेबलावर बसलेल्या तरुण आणि तरुणीकडे चालत जाताना दिसतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये SHO त्या तरुणाला विचारताना ऐकू येतो, “कौन है ये?” (ही कोण आहे?) त्यावर तरुण शांतपणे उत्तर देतो, “बहन है मेरी” (ही माझी बहिण आहे).

मात्र एवढंच उत्तर ऐकताच SHO अचानक संतापतो आणि त्याचा आवाज चढवतो. तो तरुणाला “जास्त बोलू नकोस” असं म्हणत त्याला रागाने झापतो. तरुण मात्र शांत राहून म्हणतो, “आपने पूछा तो मैंने कहा बहन है”. यावरून वाद अधिकच चिघळतो आणि आणखी एक पोलीस अधिकारी तिथे येऊन परिस्थिती अधिक ताणलेली बनवतो.

हेही वाचा – डिस्ने वर्ल्डमध्ये सलग तिसरा मृत्यू! “जगातील सर्वात आनंदी ठिकाणी” घडतंय असं काय जे कोणी सांगतच नाही?

रेस्टॉरंटमधील इतर ग्राहक हे सर्व प्रसंग पाहत होते. काहींनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तणाव वाढतच गेला. काही क्षणांतच हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि लोकांनी पोलिसांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर काठीहार (Katihar) येथील डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस (DSP – मुख्यालय) यांनी चौकशी सुरू केली. चौकशीत SHO ने अशिष्ट भाषा वापरली असल्याचे आणि त्याचे वर्तन पोलीस विभागाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित (suspended) करण्यात आलं असून, त्याच्याविरुद्ध पुढील विभागीय कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेनंतर बिहार पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, नागरिकांमध्ये “पोलिसांकडून साध्या जनतेशी असं वर्तन?” असा संताप व्यक्त होत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment