चालत्या गाडीतून उभ्याने लघुशंका! थारवाल्याची निर्लज्ज कृती; व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

Thar Car Pee Incident Viral Video : गुरुग्राम (हरियाणा) येथील एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर चालत्या महिंद्रा थार गाडीतून एका युवकाने अशी लाजीरवाणी आणि अशोभनीय कृती केली की, पाहणाऱ्यांनी डोळे झाकले. या घटनेचा व्हिडिओ काही सेकंदातच व्हायरल झाला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे आणि थार गाडी जप्त केली आहे.

NDTV च्या वृत्तानुसार, ही घटना बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या सदर बाजार परिसरात घडली. थारच्या मागे चाललेल्या दुसऱ्या वाहनातील व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला.

तपासात उघड झाले की ही महिंद्रा थार 23 वर्षीय मोहित नावाच्या युवकाची होती, तर त्याचा मित्र अनुज (25) गाडीत सोबत होता. दोघेही हरयाणातील झज्जर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

हेही वाचा – कोपर मारलं, चिमटा काढला….; नितीन गडकरींसमोर दोन महिला अधिकारी भिडल्या; हा VIDEO पाहिलात का?

व्हिडिओमध्ये दिसते की मोहित निष्काळजीपणे थार चालवत असताना, अनुज गाडीचे दार उघडे ठेवून साइड स्टेपवर उभा राहतो आणि चालत्या वाहनातून रस्त्यावर उभ्याच अवस्थेत लघुशंका करतो. या संतापजनक कृतीमुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला.

गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि गाडी जप्त केली. पोलीस अधिकारी संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुन्ह्यात वापरलेली थार ही मोहितचीच आहे. तो निष्काळजीपणे गाडी चालवत होता, तर अनुजने सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अश्लील कृत्य केले.”

पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितले की, मोहितविरुद्ध यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. राजस्थानमधील झाझर येथे खुनाचा एक गुन्हा, हरियाणातील रोहतकमध्ये मारहाणीचे दोन गुन्हे आणि आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत एक प्रकरण दाखल आहे. तो डिसेंबर 2022 मध्ये जामिनावर सुटला होता.

सध्या पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment