Viral Video : ट्रेनमध्ये झोपायला जागा नाही? मग या भाईने काय केलं बघा… थेट टॉयलेटचं बेडरूम बनवलं!

WhatsApp Group

Man Turns Train Toilet Into Bedroom Viral Video : दिवाळीचा हंगाम म्हणजे प्रवासाचा हंगाम! देशभरातील रेल्वे स्थानकं गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अशा गर्दीत प्रवाशांना उभं राहायलाही जागा मिळत नाही, तेव्हा एक अनोखा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा प्रकार घडला एका भरगच्च दिवाळी स्पेशल ट्रेनमध्ये, जिथे एका प्रवाशाने अक्षरशः ट्रेनचं टॉयलेटच स्वतःचं बेडरूम बनवलं!

हा व्हिडिओ ट्रॅव्हल व्लॉगर विशाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शर्मा एका प्रवाशाला ट्रेनच्या छोट्याशा वॉशरूममध्ये अगदी आरामात बसलेला दाखवतात. त्या प्रवाशाभोवती त्याची बॅग, बाटल्या, आणि काही वस्तू नीट लावलेल्या दिसतात, जणू काही तो स्वतःच्या खोलीतच बसलाय!

शर्मा म्हणताना ऐकू येतात, “पहा, या माणसाने टॉयलेटलाच आपलं बेडरूम बनवलंय! दिवाळीच्या शुभेच्छा मित्रांनो, ट्रेनमध्ये आजकाल किती गर्दी आहे तुम्हाला माहीतच आहे. बघा तर, याचं बेडरूमचं सेटअप!”

हेही वाचा – ‘बहीण आहे माझी’ असं म्हणताच पोलीस संतापला… रेस्टॉरंटमध्ये गोंधळ; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन

हा व्हिडिओ अवघ्या पाच दिवसांत तब्बल 1.4 मिलियन व्ह्यूज मिळवत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया तर अजूनच भन्नाट! काहींनी लिहिलं, “नंतर म्हणतात सरकार खराब ट्रेन देते, पण लोक स्वतःच बिघडवतात!” तर एकाने जोक करत लिहिलं, “मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है!”

दुसऱ्या एका युजरने चिडून म्हटलं, “लोकांना सार्वजनिक स्वच्छतेची काहीच जाणीव नाही… आता इतरांना टॉयलेट वापरायला कसं मिळणार?”

विशाल शर्मा यांचा हा पहिलाच व्हायरल व्हिडिओ नाही. त्यांनी यापूर्वीही बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमधील गर्दीचं वास्तव दाखवलं होतं, जिथे प्रवासी उभे राहायलाही त्रास सहन करत होते.

दिवाळीच्या काळात भारतीय रेल्वेतील गर्दी, जुगाड आणि प्रवाशांच्या ‘नवीन कल्पकता’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काहीही म्हणा, पण भारतात प्रवास म्हणजे “एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड” हे पुन्हा सिद्ध झालं आहे!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment