Google Maps ला टक्कर देणारं भारतीय अ‍ॅप! केंद्रीय मंत्र्यांनीच केली शिफारस, जाणून घ्या ‘Mappls’ चे भन्नाट फीचर्स

WhatsApp Group

Mappls App :  भारतामध्ये गेल्या काही वर्षांत “Made in India” अ‍ॅप्सची लाट आली आहे. सोशल मीडियावर सध्या ‘देसी अ‍ॅप्स’चा जोरदार बोलबाला सुरू आहे. नुकतंच Zoho कंपनीने बनवलेलं Arattai मेसेजिंग अ‍ॅप चर्चेत आलं होतं. आणि आता देशात आणखी एक भारतीय अ‍ॅप गाजतंय – Mappls App.

हे अ‍ॅप बनवलं आहे देशातील प्रसिद्ध टेक कंपनी Map My India ने, जी गेल्या जवळपास 30 वर्षांपासून नेव्हिगेशन क्षेत्रात कार्यरत आहे. हे अ‍ॅप नवीन नाही – 2004 पासूनच भारतीयांना रस्ते दाखवतंय. अनेक कारच्या स्क्रीनमध्ये हे अ‍ॅप आधीपासूनच इंस्टॉल केलेलं असतं.

अलीकडेच केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अ‍ॅपचे काही भन्नाट फीचर्स सांगत एक खास पोस्ट शेअर केली आणि त्यामुळे Mappls पुन्हा चर्चेत आलं आहे.

प्रत्येक गल्लीतला रस्ता मॅपमध्ये

‘Mappls’ हे खऱ्या अर्थाने भारतीय अ‍ॅप आहे. त्यामुळे गावांच्या अरुंद गल्लीपासून ते शहरांच्या मोठ्या हायवेपर्यंत प्रत्येक रस्त्याची अचूक माहिती या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. Google Maps सारख्या विदेशी अ‍ॅप्सच्या तुलनेत Mappls भारतीय परिस्थितीला अधिक अनुरूप मानलं जातं. सध्या Android वर या अ‍ॅपला 4.3 रेटिंग आणि 1 कोटीहून अधिक डाउनलोड्स मिळाले आहेत. iPhone साठीही हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

Mappls चे जबरदस्त फीचर्स जे Google Maps कडेही नाहीत

3D Junction View

अनेकदा दोन रस्ते किंवा मोठा ब्रिज आल्यावर आपण गोंधळतो. Mappls मध्ये 3D जंक्शन व्यू फीचरमुळे हे जंक्शन स्क्रीनवर वेगळं दाखवलं जातं आणि व्हॉइस नेव्हिगेशनने बोलून दिशा सांगितली जाते.
असं म्हणतात की, Google Maps ने हे फीचर Mappls कडूनच प्रेरित होऊन आणलं आहे!

खड्डे, स्पीड ब्रेकर आणि टोल माहिती

भारतीय रस्त्यांवरील खड्ड्यांची माहितीही आता अ‍ॅपमध्ये मिळणार! Mappls अ‍ॅप तुम्हाला रस्त्यावरील खड्डे, स्पीड ब्रेकर आणि तीव्र वळणं दाखवतं. याशिवाय रस्त्यात किती टोल आहेत, किती पैसे द्यावे लागतील – हे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतात.

स्पीड कॅमेरा अलर्ट

तुमच्या वाहनाची वेगमर्यादा किती आहे आणि कुठे स्पीड कॅमेरा लावलेला आहे, याची माहिती Mappls अ‍ॅप तुम्हाला अगोदरच देतं. यामुळे ट्रॅफिक नियमभंग टाळता येतो. पण लक्षात ठेवा – हे फीचर वेग वाढवण्यासाठी नाही, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आहे.

‘सच्ची मुच्ची’ लोकेशन

एखाद्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी आता ‘लँडमार्क’ शोधायची गरज नाही. Mappls अ‍ॅप तुम्हाला थेट लोकेशनवर घेऊन जातं.

ट्रॅफिक लाइट टाइमर

बेंगळुरूमध्ये सध्या या अ‍ॅपचं एक विशेष फीचर उपलब्ध आहे – ट्रॅफिक सिग्नलवर किती सेकंद शिल्लक आहेत, हे अ‍ॅप स्क्रीनवर दाखवतं. लवकरच हे फीचर देशभर लागू होणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांनाही आवडलेलं अ‍ॅप

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः Mappls अ‍ॅप वापरल्याचं सांगितलं आहे आणि नागरिकांना हे देसी अ‍ॅप वापरण्याचं आवाहन केलं आहे.

भारतीय डेटा भारतातच राहावा आणि देशी टेक्नॉलॉजीला चालना मिळावी, या उद्देशाने Mappls ला मोठं महत्त्व दिलं जातंय.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment