“मी भारतासाठी वर्ल्डकप जिंकणार!”, सचिनच्या दर्शनाने जेमिमाचे आयुष्य कसं बदललं?

WhatsApp Group

Jemimah Rodrigues : मुंबईची तरुण क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्ज आज प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची ध्वजवाहक ठरली आहे. 2025 महिला वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत टीम इंडिया पोहोचली आहे आणि या प्रवासात जेमिमाच्या बॅटने कमाल केली आहे. पण तिच्या या यशामागे एक प्रेरणादायी किस्सा दडलेला आहे, सचिन तेंडुलकरच्या एका दर्शनाने तिच्या आयुष्याची दिशा बदलली!

सचिनमुळे जन्माला आलं ‘वर्ल्डकप’ स्वप्न

Mashable India च्या एका मुलाखतीत जेमिमाने सांगितलं की ती लहानपणी सचिन तेंडुलकर सरांच्या परिसरात राहायची. 2011 च्या वर्ल्डकप विजयाच्या दिवशी सचिन सर घरी परतताना पाहिलेला तो क्षण तिच्यासाठी आयुष्यभराचा टर्निंग पॉईंट ठरला.

हेही वाचा – ताम्हिणी घाटात थरकाप उडवणारा अपघात! चालत्या कारच्या सनरुफवर दगड कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

“मी 11 वर्षांची होते. सचिन सरांच्या बिल्डिंगसमोर प्रचंड गर्दी होती. लोकांमध्ये अशी वेड्यासारखी उत्सुकता मी कधी पाहिली नव्हती. त्यावेळी मला वर्ल्डकप म्हणजे काय तेही माहीत नव्हतं. पण त्या दिवशी मनात ठरवलं, मी भारतासाठी वर्ल्डकप जिंकणार!” त्या क्षणापासून जेमिमाचं ध्येय स्पष्ट झालं, टीम इंडियासाठी वर्ल्डकप!

127 धावा आणि भारताला अंतिम फेरीत!

ऑस्ट्रेलियविरुद्ध नवी मुंबईत जेमिमाने नाबाद 127 धावा ठोकत इतिहास रचला. 339 धावांचा अकल्पित पाठलाग करून भारताला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवून दिलं. तिची ही खेळी क्रिकेटविश्वाने ‘Golden Knock’ म्हणून गौरवली आहे.

“हेच खरं ध्येयपूर्तीचं स्वप्न”, “सचिनने पिढ्यांना प्रेरणा दिली!”, “मॅनिफेस्टेशन म्हणजे हेच!” फॅन्सनी अशा पद्धतीने व्यक्त होत सोशल मीडियावर तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता रविवार, 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना. भारताचं लक्ष पहिलं महिला वर्ल्डकप ट्रॉफीवर असेल!  

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment