रस्ते अपघातातील जखमींना सरकारकडून मोफत उपचार, संपूर्ण भारतात लागू होणार व्यवस्था!

WhatsApp Group

रस्ते अपघातातील बहुतांश मृत्यू हे उपचारास उशीर झाल्यामुळेच होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकार लवकरच रस्ते अपघातात मोफत उपचाराची व्यवस्था (Cashless Medical Treatment For Road Accident) करणार आहे. जेणेकरून जखमींना लवकरात लवकर मोफत उपचार मिळून त्यांचे जीव वाचू शकतील. यासाठी मोटार वाहन कायद्यात यापूर्वीच बदल करण्यात आले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 4.46 लाख रस्ते अपघात झाले, ज्यात 4.23 लाख लोक जखमी झाले आणि 1.71 लाख लोकांचा मृत्यू झाला.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच या संदर्भात घोषणा करू शकते. येत्या 4 महिन्यांत संपूर्ण देशात ही सुविधा लागू केली जाईल. मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले, की रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात. मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा नियम मोटार वाहन कायद्यात समाविष्ट आहे. काही राज्यांमध्ये हा नियम पाळला जात आहे. पण आता ती संपूर्ण देशात लागू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण देशात कॅशलेस उपचार प्रणाली लागू करण्याचे आवाहन आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला केले आहे.

मोटार वाहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात यावेत. अपघातानंतर पहिल्या काही तासांतच उपचार उपलब्ध झाले तर अनेकांचे प्राण वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. अपघातानंतरचे पहिले काही तास खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळी जखमी व्यक्तीला डॉक्टरांकडे नेले, तर त्याला तातडीने उपचार मिळून जगण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा – आयुष्मान योजनेत ‘या’ आजारांवर केले जातात उपचार, जाणून घ्या!

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबवणार आहे. याशिवाय, भारत NCAP देखील राबविण्यात येत आहे. यामध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि वाहनांमधील तांत्रिक बदल यांचा समावेश आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये 4,46,768 रस्ते अपघात झाले. त्यापैकी 4,23,158 लोक जखमी झाले आणि 1,71,100 लोकांचा मृत्यू झाला. एकूण रस्ते अपघातांपैकी 45.5 टक्के अपघात दुचाकींमुळे झाले आहेत. यानंतर, कारमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांचा वाटा 14.1 टक्के होता. यामध्ये सर्वाधिक अपघात अतिवेगाने झाले असून 1 लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालानुसार, रस्ते अपघात हे गावांमध्ये जास्त झाले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment