Unlucky 13 : : 13 नंबर अशुभ का मानला जातो? लोक या आकड्याला का घाबरतात?

WhatsApp Group

13 Number Unlucky जगातील अनेक देशांमध्ये 13 हा नंबर अत्यंत अशुभ (Unlucky Number 13) मानला जातो. या नंबरचा आपल्या आयुष्याशी कोणताही संबंध जोडण्याचा लोकांचा मानस नसतो. अनेक हॉटेल्समध्ये 13 नंबरचा फ्लॅट नाहीये. या दिवशी लोक लग्नही करत नाहीत. काहींना सण साजरा करायलाही आवडत नाही. काही लोक हा नंबर बोलतही नाहीत. पण यामागचे कारण काय? जगाला हा नंबर अशुभ का वा़टतो?

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, 13 नंबरपासून अंतर ठेवण्यामागे अनेक रहस्ये आणि अनेक प्रकारच्या समजुती आहेत. 13 हा आकडा ख्रिश्चनांमध्ये अशुभ मानला जातो कारण येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांसह घेतलेल्या शेवटच्या रात्रीच्या जेवणात 13 लोक होते. असे म्हटले जाते की त्या वेळी यहूदाने येशूचा विश्वासघात केला होता, परिणामी येशूला खिळे ठोकण्यात आले होते. हा दिवस शुक्रवार होता, त्यामुळे शुक्रवारही शुभ दिवस मानला जात नाही आण 13 तारखेला शुक्रवारी आला, तर ते अधिक अशुभ मानला जाते.

हेही वाचा – इस्रोमध्ये नोकरी, ITI पास झालेल्यासाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या तपशील

13 नंबर अशुभ का ?

मानसशास्त्राने 13 क्रमांकाच्या या भीतीला त्रिस्कायडेकाफोबिया किंवा तेरा अंकी फोबिया असे नाव दिले आहे. पाश्चात्य देशांमध्ये, ही भीती इतकी वाढली की लोकांनी 13 नंबर वापरणे बंद केले. हे पाप मानले जाऊ लागले. त्यामुळे परदेशात कोणत्याही हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा कोणत्याही इमारतीत 13 व्या मजल्यावर खोली नसते. एखाद्या हॉटेलने असे केले, तर लोक त्याला अशुभ मानतात आणि त्यात राहणे टाळतात. युरोपियन-अमेरिकन देशांमध्ये, आपल्याला रेस्टॉरंटमध्ये टेबल क्रमांक 13 दिसणार नाही. फ्रान्समध्ये डायनिंग टेबलवर 13 खुर्च्या ठेवल्या तर लोक तिथे जेवत नाहीत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment