Samrat Choudhary Bihar CM : बिहारच्या राजकारणात बुधवारी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, बिहारच्या राजकीय इतिहासात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाटण्यातील लोकभवनात राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी सम्राट चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नितीश युगाचा शेवट आणि नवी समीकरणे
गेल्या अनेक वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे जनता दल युनायटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळ बरखास्त केले. नितीश कुमार आता राज्यसभा खासदार म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार असून, त्यांच्या या निर्णयामुळे बिहारमधील ‘नितीश युगाचा’ अंत झाल्याचे मानले जात आहे. सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या नवीन सरकारमध्ये जेडीयूचे नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून, ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील.
🚨 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 𝗗𝗔𝗬 𝗙𝗢𝗥 𝗕𝗜𝗛𝗔𝗥!🚩#SamratChoudhary officially takes the oath as the Chief Minister of #Bihar!
— Gaurav (@k_gauravs) April 15, 2026
First-ever #BJP CM in the state's history.
End of a 20-year era of #NitishKumar.
Saffron Surge reaches the driver's seat.#Breakingpic.twitter.com/x6ef5fKqhN
भाजपचा दबदबा आणि राजकीय महत्त्व
सम्राट चौधरी यांच्या शपथविधीसह, देशातील 16 राज्यांमध्ये आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तसेच बिहार हे भाजपचे सरकार असलेले देशातील 19वे राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असताना बिहारमध्ये मात्र त्यांना अद्याप मुख्यमंत्रिपद मिळवता आले नव्हते, जी उणीव आज भरून निघाली आहे.
🚨 Nitish Kumar revealed the name to Samrat Chaudhary in the morning itself.
— News Algebra (@NewsAlgebraIND) April 14, 2026
During a budget session, CM Nitish Kumar even patted Samrat Chaudhary's back in the Assembly.
BJP creates history in Bihar.
Samrat Chaudhary to become the first BJP Chief Minister of Bihar. 🔥 https://t.co/KYs37cwQyw pic.twitter.com/1GMwdx8uke
कोण आहेत सम्राट चौधरी?
1968 मध्ये जन्मलेले सम्राट चौधरी एका राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे तारापूर मतदारसंघातून सहावेळा आमदार राहिले आहेत, तर त्यांच्या आई पार्वती देवी यांनीही याच जागेवरून निवडणूक जिंकली होती. 1990 मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या सम्राट चौधरी यांनी आपला राजकीय प्रवास लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीमधून सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आणि 2017 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले.
जातीय समीकरणांची मोठी खेळी
बिहारच्या गुंतागुंतीच्या राजकीय रचनेत सम्राट चौधरी यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रभावशाली ‘कोइरी’ समाजातून येणारे ते बिहारचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 1968 मध्ये सतीश प्रसाद सिंह यांनी या समाजातून मुख्यमंत्रिपद भूषवले होते, परंतु त्यांचा कार्यकाळ केवळ पाच दिवसांचाच राहिला होता.
सम्राट चौधरी यांच्या रूपाने भाजपने केवळ मुख्यमंत्रिपदच मिळवले नाही, तर राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी एक मोठे सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा