Indore Water Contamination : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोठी आरोग्यदृष्ट्या दुर्घटना घडली आहे. भगीरथपुरा परिसरात किमान 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक नागरिक आजारी पडले आहेत. अधिकृत नोंदीनुसार मृतांची संख्या 3 असल्याचा दावा केला जात असला तरी, इंदूर महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी प्रत्यक्ष मृतांची संख्या 7 वर पोहोचल्याचे सांगितले आहे.
प्रकरण कसे उघडकीस आले?
24 डिसेंबरपासून या भागात ओकाऱ्या, जुलाब आणि पोटदुखीची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, नळांच्या पाण्यातून दुर्गंधी व घाण येत असूनही पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला. आतापर्यंत 1000 हून अधिक नागरिकांनी उपचार घेतले असून 40 पेक्षा जास्त लोक आजही गंभीर आजारी आहेत.
In Indore, 5 people have died after consuming contaminated water and around 40 people have been hospitalised.
— Saral Patel (@SaralPatel) December 31, 2025
The Modi govt keeps giving Indore the “cleanest city” tag every year. Is a city clean if its people do not even get safe drinking water?
Under the govt led by Narendra… pic.twitter.com/y4926QroQG
सरकारची मोठी कारवाई
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 3 महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
- झोनल ऑफिसर सस्पेंड
- असिस्टंट इंजिनिअर सस्पेंड
- सब-इंजिनिअरची सेवा थेट समाप्त
तसेच 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹2 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
रहिवाशांच्या तक्रारी कानाडोळा?
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून दूषित पाण्याची समस्या सुरू होती, पण repeated तक्रारी असूनही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. मुलं आणि वृद्ध यांची प्रकृती सर्वाधिक बिघडली असून अनेक कुटुंबांवर 10–40 हजार रुपयांपर्यंतचा उपचार खर्च आला आहे.
दूषित पाणी आले कसे?
प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली —
✔ भगीरथपुराला जाणारी नर्मदा पाण्याची मुख्य लाईन सार्वजनिक शौचालयाखालून जाते
✔ त्या लाईनमध्ये गळती होऊन गटारातील पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळले
✔ परिसरातील अनेक वितरण लाईन्सही तुटलेल्या स्थितीत होत्या
याहून धक्कादायक म्हणजे ₹2.5 कोटींची नवी पाईपलाईन टाकण्याचा टेंडर 4 महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता, पण काम सुरूच झाले नाही!
अंगणवाडी सेविकांचा जीव धोक्यात
दरवाजे-दरवाजे जाऊन लोकांची माहिती गोळा करणाऱ्या अंगणवाडी सेविकाही आजारी पडल्या आहेत.
काहींनी सांगितले की 40 हून अधिक रुग्णांना त्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये दाखल केले, कुटुंबातील सदस्यांवर 15–40 हजारांपर्यंतचा खर्च आला
रुग्णालयात गर्दी
संजिवनी क्लिनिकसह परिसरातील रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी असून, नवीन प्रकरणे अजूनही समोर येत आहेत. प्रशासनाने गावागावात सर्वे करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जबाबदार दोषींवर पुढील कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा