Singapore Maid Fine : सिंगापूरमध्ये एक मेड आपल्या एका घरकामासोबत दुसऱ्या ठिकाणीही घरकाम करत होती. मात्र, तिचा हा अतिरिक्त कमाईचा प्रयत्न तिला महागात पडला, तिला तब्बल 8.8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे!
काय आहे प्रकरण?
53 वर्षीय पिडो एर्लिंडा ओकॅम्पो नावाची महिला सिंगापुरमध्ये 1994 पासून कायदेशीररीत्या मेड म्हणून काम करत होती. पण एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2020 आणि पुन्हा मार्च 2022 ते सप्टेंबर 2024 दरम्यान, तिने दोन वेगवेगळ्या कुटुंबांसाठी पार्ट टाइम घरकाम केलं. हे करताना ती आपल्या अधिकृत कामाच्या दिवशीही 2-4 तास दुसऱ्या घरात सफाईचं काम करत होती. तिला या कामासाठी महिन्याला 375 सिंगापुरी डॉलर मिळत होते.
हेही वाचा – 60 सेकंदात 2 लाखांची लूट! रस्त्यावर लहानगा पडला आणि…जळगावात फिल्मी स्टाईल चोरीचा VIDEO!
कायदेशीर अडचण
सिंगापुरच्या कायद्यानुसार, विदेशी मेड्सना फक्त त्यांच्या अधिकृत एंप्लॉयरसाठीच काम करता येतं. अन्यत्र काम करणं हे गैरकायदेशीर मानलं जातं. यासाठी 20,000 सिंगापुरी डॉलर दंड किंवा 2 वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात. याच प्रकरणात काम देणाऱ्यांवरही कारवाई झाली. सोह ओई बेक या व्यक्तीला 7,000 सिंगापुरी डॉलरचा दंड झाला. त्याने जाणूनबुजून तिच्याकडून काम करून घेतल्याचं कोर्टात मान्य केलं.
कायदा म्हणतो काय?
- सिंगापुरमधील मानव संसाधन मंत्रालय (Ministry of Manpower) यांना 2024 मध्ये ही माहिती मिळाली.
- तपासात सगळं स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने शिक्षेचा निर्णय दिला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा