20-21 वषांचे तरुण.. 87 हजार लोकांच्या बेटावर कब्जा करण्यांची भयानक प्लॅनिंग!

WhatsApp Group

Haiti Island Attack Plan :  अमेरिकेतून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. वय केवळ 20 आणि 21 वर्षे, पण प्लॅनिंग अशी की ऐकूनही अंगावर काटा येईल! टेक्सासमध्ये दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आरोप इतका भयानक की कल्पनाही न करता येणार —हैती देशातील गोनवे नावाच्या बेटावर हल्ला करून कब्जा करण्याची, बेटातील सर्व पुरुषांची हत्या करण्याची आणि स्त्रिया व मुलांचा लैंगिक शोषणासाठी वापर करण्याची योजना त्यांनी आखली होती.

अमेरिकन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॅलस परिसरातील 21 वर्षीय गेविन रिवर वीजेनबर्ग आणि 20 वर्षीय टान्नर क्रिस्टोफर थॉमस यांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर परदेशात हत्या, अपहरण आणि जीवघेणा हल्ल्याची कटकारस्थान, तसेच चाइल्ड पोर्नोग्राफी तयार करण्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलाला लैंगिक कृत्यात सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे.

काय होती घातक योजना?

अभियोगानुसार, या दोघांनी ऑगस्ट 2024 ते जुलै 2025 या काळात बेटावर कब्जा करण्याची योजना तयार करत तयारी सुरू केली. ते:

  • बेघर लोकांची ‘आर्मी’ तयार करत होते
  • सेलबोट खरेदी करण्याची योजना
  • हैतीतील गोनवे या बेटावर हल्ला करण्याची तयारी
  • अमेरिकन रायफल, गोळाबारुद आणि शस्त्रांची माहिती गोळा करत होते
  • हैतीयन क्रियोल भाषा शिकण्याचा प्रयत्न
  • वायुसेनेत सामील होऊन युद्ध प्रशिक्षण मिळवण्याचा हेतू

गोनवे बेटावर सुमारे 87,000 लोकसंख्या आहे आणि ते 751 चौ.किमी क्षेत्रफळाचे आहे.

विगेनबर्गने डॅलसमधील फायर अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतले, तर थॉमसने अमेरिकन वायुसेनेत प्रवेश घेतला होता. त्याने वॉशिंग्टन डी.सी. येथे बेघर लोकांना भरती करण्याचे काम मिळवण्यासाठी नियुक्ती बदलली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

कोर्टात नकार, पण शिक्षा कठोर

दोघांनीही कोर्टात गुन्हा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. थॉमसच्या वकीलांनी सांगितले, “त्यांनी प्रत्यक्षात कधी काही केलेच नाही.”

परंतु, आरोप सिद्ध झाल्यास:

  • चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी 30 वर्षे तुरुंग
  • कट सिद्ध झाल्यास आजीवन कारावास

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment