Zombie Scavenger short film : सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) मानवी क्षमतेच्या मर्यादा कशा ओलांडत आहे, याचे जिवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. एका २९ वर्षांच्या तरुणाने, ज्याला चित्रपट निर्मितीचा कोणताही पूर्वअनुभव नाही, ना कोणती मोठी पदवी, त्याने आपल्या खोलीत बसून एका अशा शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे, ज्याने थेट हॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकांना चक्रावून सोडले आहे. अवघ्या ४२ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सध्या जागतिक स्तरावर ६ कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला असून, चित्रपटसृष्टीच्या भविष्यातील एका नव्या क्रांतीची नांदी दिली आहे.
या संपूर्ण प्रवासाची कथा जितकी कौतुकास्पद आहे, तितकीच ती थक्क करणारी आहे. चीनमधील एका छोट्या प्रांतात राहणाऱ्या या माजी रेल्वे ड्रायव्हरच्या प्रतिभेने आता जागतिक सिनेमाचे समीकरण बदलण्यास सुरुवात केली आहे.
कोण आहे हा अवलिया? रेल्वे ट्रॅक ते थेट डिजिटल स्क्रीन
चीनच्या नैऋत्येकडील युनान प्रांतात असलेल्या शिनपिंग काउंटीमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय ‘लियू झियू’ (Liu Ziyu) याची ही कहाणी आहे. लियूचे पार्श्वभूमी पाहिली तर त्याचा आणि चित्रपटसृष्टीचा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. त्याने एका तांत्रिक विद्यालयातून ‘कम्बशन इंजिन ड्रायव्हिंग आणि मेंटेनन्स’चे शिक्षण घेतले होते. या शिक्षणानंतर त्याने तब्बल तीन वर्षे रेल्वे ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. रेल्वेच्या खडखडाटात दिवस घालवणाऱ्या लियूच्या मनात मात्र काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यानंतर त्याने ती नोकरी सोडली आणि लग्नकार्यात फोटोग्राफी करण्याचे काम सुरू केले. मात्र, त्याच्या नशिबात काहीतरी ऐतिहासिक लिहिलेले होते.
‘झोंबी स्केव्हेंजर’: ३ हजार युआन आणि १० दिवसांचा चमत्कार
लियूने ‘झोंबी स्केव्हेंजर’ (Zombie Scavenger) नावाचा साडेतीन मिनिटांचा एक लघुपट (Short Film) तयार केला. हा चित्रपट ‘अॅटमपंक’ (Atompunk) शैलीतील सायन्स फिक्शन प्रकारात मोडतो. यात एका रोबो आणि मॉडेल बाहुलीची अत्यंत भावनिक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. लियूच्या मते, २००८ मध्ये आलेल्या डिस्नेच्या प्रसिद्ध ‘वॉल-ई’ (WALL-E) या चित्रपटातून प्रेरणा घेऊन त्याने ही कथा रचली.
This is one of the best short films I’ve seen in years.
Very soon, we’ll stop calling it “AI film” and just call it film. pic.twitter.com/6yjU6HcnzN— PJ Ace (@PJaccetturo) May 10, 2026
हेही वाचा – Bakrid 2026 : ‘डोनाल्ड ट्रम्प’ नावाची म्हैस कुर्बानीपासून वाचली! बांगलादेशातील घटनेची जगभरात चर्चा
सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण चित्रपट लियूने एकट्याने, कोणत्याही प्रॉडक्शन हाऊस किंवा टीमशिवाय अवघ्या १० दिवसांत पूर्ण केला. यासाठी त्याला एकूण ३,००० युआन (भारतीय चलनानुसार सुमारे ४२,००० रुपये) खर्च आला. हा खर्च त्याने केवळ वेगवेगळ्या AI टूल्सचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी केला होता.
हॉलिवूड दिग्दर्शकाची एन्ट्री आणि एका रात्रीत बदललं नशीब
९ मे रोजी जेव्हा लियूने हा चित्रपट चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला, तेव्हा सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, या कथेला खरा कलाटणी मिळाली जेव्हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध एआय फिल्ममेकर ‘पीजे असेटुरो’ (PJ Accetturo) यांच्या नजरेत हा चित्रपट आला.
असेटुरो यांनी या शॉर्ट फिल्मचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत ६० दशलक्ष (६ कोटी) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. असेटुरो लियूच्या कौशल्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी थेट सोशल मीडियावरून त्याला शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिले,
“जर कोणाला या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा पत्ता लागला, तर कृपया त्याच्या सोशल मीडियाची लिंक द्या. मला त्याला माझ्या प्रोजेक्टसाठी कामावर घ्यायचे आहे, पण मी त्याला शोधू शकत नाहीये. मला वाटते तो डौयिन (Douyin) वरील चायनीज क्रिएटर आहे.”
“मला इंग्रजी येत नाही…” हॉलिवूडच्या ऑफरवर थेट उत्तर
नेटिझन्सनी अथक प्रयत्नांनंतर लियू आणि पीजे असेटुरो यांची भेट घडवून आणली. जेव्हा हॉलिवूडमधून थेट अमेरिकेत येऊन काम करण्याची आणि मोठ्या जाहिराती तसेच चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची ऑफर लियूला देण्यात आली, तेव्हा त्याने अत्यंत साधेपणाने पण तितक्याच ठामपणे उत्तर दिले. लियू म्हणाला,
“मला इंग्रजी बोलता येत नाही. मला सध्या चीनमध्येच राहून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या माझा अमेरिकेत जाण्याचा कोणताही विचार नाही. माझ्यासाठी ते अमेरिकेतील माझ्या चांगल्या मित्रांसारखे आहेत.”
जरी भाषेची अडचण असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने लियूने असेटुरोच्या टीमशी संपर्क साधला असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर एकत्र काम करण्याचे मार्ग खुले ठेवले आहेत.
लियूचा ‘सिक्रेट फॉर्म्युला’: AI कडून काम कसं करून घ्यावं?
अनेकांना वाटते की AI टूल्स वापरणे सोपे आहे, पण लियूच्या यशाचे रहस्य त्याच्या ‘प्रॉम्प्ट फॉर्म्युला’ (Prompt Formula) मध्ये आहे. अनेक लोक एआयला सरळ सरळ कमांड देतात, पण लियू तसे करत नाही. आपल्या यशाचे गमक सांगताना तो म्हणतो,
“माझा प्रॉम्प्ट फॉर्म्युला आहे: ‘हालचाल (Movement) अधिक प्रेरणा (Motivation) अधिक मनःस्थिती (Mood)’. मी एआयला फक्त एखादी हालचाल करायला सांगत नाही, तर त्या हालचालीमागील भावना आणि मूड काय असावा, हे तपशीलवार लिहितो.”
याच अनोख्या विचारसरणीमुळे त्याच्या साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मानवी भावनांचा अचूक संगम पाहायला मिळतो, जो प्रेक्षकांच्या काळजाला थेट भिडतो.
चित्रपटसृष्टीचे भविष्य आणि संभाव्य परिणाम
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा