India Cigarette Tax : भारत सरकारने सिगारेटवर नवा ‘एक्साईज ड्युटी’ कर लागू केल्यानंतर गुरुवारी भारतीय तंबाखू कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या निर्णयामुळे देशातील अंदाजे 10 कोटी धूम्रपान करणाऱ्यांसाठी सिगारेट महाग होण्याची शक्यता आहे.
भारतातील सर्वात मोठी तंबाखू उत्पादक कंपनी ITC (Gold Flake ब्रँडची निर्माती) या कंपनीचा शेअर 4.4% नी घसरून 385.25 रुपये इतका झाला. हा दर जून 2024 नंतरचा सर्वात नीचांकी स्तर ठरला असून फेब्रुवारी 2022 नंतरचा शेअरसाठीचा हा सर्वात वाईट दिवस मानला जात आहे.
तर Godfrey Phillips India, जी भारतात Marlboro सिगारेटचे वितरण करते, तिच्या शेअर्समध्ये तब्बल 7.7% घसरण झाली. Nifty 50 निर्देशांकात ITC हा सर्वात मोठा घट झालेला शेअर ठरला. तसेच FMCG निर्देशांकातही सर्वाधिक घसरण याच कंपनीमुळे पाहायला मिळाली.
हेही वाचा – VIDEO : मुख्याध्यापकाने स्वत:च्या खिशातले 5 लाख घालून विद्यार्थ्यांना बसवलं विमानात! संपूर्ण गाव भावूक
सरकारने नेमका काय कर लावला?
वित्त मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे 1 फेब्रुवारीपासून सिगारेटवर 2050 ते 8500 रुपये प्रति 1000 सिगारेट (लांबीप्रमाणे) एक्साईज ड्युटी आकारली जाणार आहे.
म्हणजेच साधारण 75–85 मिमी लांबीच्या सिगारेटचे एकूण खर्च आता 22% ते 28% पर्यंत वाढतील, असे ICICI Securities या विश्लेषक संस्थेने म्हटले आहे.
सरकारचा उद्देश काय?
धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे भारतावर होणारा आर्थिक ताण खूप मोठा आहे. त्यामुळे सरकारने सिगारेटवरील कर वाढवणे, मोठ्या वॉर्निंग लेबेल्स लावणे अशा विविध उपाययोजना केल्या आहेत, ज्यामुळे लोकांना धूम्रपानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे.
शेअर बाजारातील धक्क्यामुळे गुंतवणूकदार चिंतित
सरकारच्या या हालचालीमुळे तंबाखू उद्योगावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता पुढील काही दिवसांमध्ये तंबाखू कंपन्या आणि बाजार यावर कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा