‘राहुल गांधी, तुम्ही लग्न कधी करणार?’, चिमुकल्या यूट्यूबरचा निरागस प्रश्न, उत्तर ऐकून सगळेच हसले!

WhatsApp Group

Rahul Gandhi Viral Video : राजकीय चर्चांमध्ये नेहमी गंभीर विषयांवर बोलणारे राहुल गांधी यांचा एक वेगळा, हसरा आणि मानवी चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका चिमुकल्या यूट्यूबरसोबतची त्यांची गप्पांची व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये त्या मुलाने राहुल गांधींना थेट विचारलं, “तुम्ही लग्न कधी करणार?”

ही निरागस चर्चा ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसलेच. मुलाचं नाव अर्श नवाज असून तो एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि व्ह्लॉगर आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर 41 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे, अर्शने यापूर्वीही तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांसारख्या नेत्यांची मुलाखत घेतली आहे.

राहुल गांधींशी संवाद साधताना अर्शने त्यांना “भविष्यातले पंतप्रधान” म्हटलं. त्यानंतर त्याने हसत विचारलं, “आप शादी कब करोगे?” यावर राहुल गांधीही अगदी सहज हसून म्हणाले, “देखेंगे… अभी तो काम कर रहा हूं.”

हेही वाचा – रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख व ठिकाण जाहीर!

यानंतर राहुल गांधींनीही त्याच्यावर उलट प्रश्न फेकला, “तू लग्न कधी करणार?” त्यावर अर्शने निरागसपणे उत्तर दिलं, “22 वर्षात.” हे ऐकून राहुल म्हणाले, “अरे मग अजून खूप वेळ आहे.” हे ऐकून आसपासचे सर्व लोक हसायला लागले.

संपूर्ण संभाषण जवळपास दोन मिनिटांचं असलं तरी त्या छोट्याशा गप्पांमध्ये राहुल गांधींची सहजता आणि मुलाशी संवाद साधण्याची प्रेमळ वृत्ती स्पष्ट दिसते. त्यांनी अर्शच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शेवटी त्याला टॉफीही दिली.

सोशल मीडियावर हे व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहेत. अनेकांनी राहुल गांधींच्या या स्वभावाचे कौतुक करत “हा त्यांचा खरा मानवी बाजू” असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी अर्श नवाजच्या आत्मविश्वासाची आणि निरागस प्रश्न विचारण्याच्या धाडसाची प्रशंसा केली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment